लाचखोरी जर कुणी एक व्यवसाय म्हणून करीत असेल तर अतिशय खेदाने आणि संतापाने सांगावे वाटते की तो मागील काही काळापासून प्रोफिटेबल व्यवसायात आहे. कारण लाचखोर सुटण्याचे प्रमाण पाहता हेच सत्य वाटते. जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने त्याच्या किमान 30 वर्षांच्या सेवेत 80,90 लाख जरी खाल्ले तरी ही ACB ट्रॅप मध्ये पकडल्या गेल्यास बाहेर पडायला 10 लाखांच्यावर पैसे लागत नाही म्हणजे निव्वळ 80 लाखांचा नफा मग सांगा असा कोठला व्यवसाय आहे जेथे 90% मर्जिन आहे. फक्त थोड निर्लज्ज व्हावं लागत. तेही थोड्या दिवस नंतर लोक विसरतात कारण 145 कोटीच्या देशात तासाला काही ना काही घडत असते. त्याही पुढे जाऊन म्हणेन आणि 1,2 लाख देवधर्म केला नातेवाईक शेजाऱ्यांच्या लग्न कार्यात मोठ्या भेटवस्तू दिल्या की ते आपले ब्रॅण्डिंग करतात “काही ही असो माणूस दिलदार आहे.” या काहीहीत तुमची लाचखोरी आपसुकच लपली जाते. म्हणून बहुतांश भ्रष्ट लोक मितभाषी असतात. का ते वर दिले आहे. मग सांगा आहे ना लाचखोरी प्रॉफिटचा धंदा विशेष म्हणजे चार पैसे आल्यावर बायको ही खुश असते कारण माहेरी एक्सपोर्ट करता येतं ज्याने भावा बहिणींमध्ये कॉलर ताट होते. अर्थात त्या वेडीला काय माहित हे पाप तिच्या मुलांना एक दिवस बाधेल असंही उद्याच कोण पाहत. अर्थात आजकाल लाजखोरीत महिलाही काही कमी नाही. त्या ही मोठ्या कष्टाने जिद्दीने पुरुषांना कडक टक्कर देतात. काही तर पुरुषांपेक्षा ही पुढे आहेत. अर्थात त्यांनी देखील का मागे राहाव संरक्षणाला महिलांचे डझनभर कायदे आहेतच.
अर्थात सर्व शासकीय नोकरदार असे नसतात काही मूर्ख देखील असतात आमच्यासारखे वेडे ज्यांना हा प्रॉफिटचा व्यवसाय कळत नाही आणि ते नोकरी सोडतात अर्थात धंदा करणं हे रक्तात असायला लागतं. पण काहीही असो हा प्रॉफिटचा धंदा ज्याला कळला त्यालाच कळला.
शिरीष प्रभाकर चव्हाण
संपादक : The Sapiens News
तथा माहिती हक्क अधिकार कार्यकर्ता





