सध्या गॅलगोटिया युनिव्हर्सिटी रोबो चीन भारतीय तंत्रद्यान या विषयी खूप काथ्याकूट सुरू आहे. नक्कीचं यात आंतरराष्ट्रीय स्तरावर काही प्रमाणात भारताची नाचक्की झाली आहे. परंतु याचे एवढे काहूर उठविण्याची गरज नाही. मुळात हाच प्रश्न आपल्याला उमजत नाही की 150 कोटी जन्संखेच्या देशात रोबोंच्या हाताला काम मिळण्यापेक्षा माणसाच्या हाताला काम मिळवून देणे आवश्यक आहे. मोठमोठ्या युनिव्हर्सिटीतून मोठ मोठ्या पदव्या घेऊन मुलं स्विगी आणि झोमॅटोत 15k वर काम करत आहे. बेकारांच्या फॅक्टरी असलेले विद्यापीठे पास आऊट झालेल्या मुलांना सन्मानाची नोकरी देऊ शकत नाही. तेथे तंत्रज्ञानाचा उपयोग करून आणखी आतंकवादी, नक्षलिस्ट, व्यसनी पिढी तयार करण्याचे पाप आपल्या गव्हर्नमेंट पॉलिसी करीत आहे. नक्कीच तंत्रज्ञानात पुढे जायला हवं परंतु त्याला आत्मसन्मान अहंकाराचा विषय न करणे हेच आपल्यासाठी श्रेयसकर असेल. त्याचबरोबर जगाच्या पाठीवर असे देखील देश आहे ज्यांच्याकडे अणुबॉम्ब न मोठे सैन्य ना अमेरिका चायना सारखे तंत्रज्ञान परंतु त्यांचा क्रमांक दरवेळी वर्ल्ड हॅपी इंडेक्स मध्ये पहिल्या 10 मध्ये असतो. उदाहरणार्थ द्यायचे झाले तर स्कॅन्डीनेवी अँड कंट्री तसेच भूतान यांचे सारखे आनंदी लोक जगात कोठेही मिळायचे नाही अगदी अमेरिका युरोप चायना दुबईमध्ये देखील नाही भांडवलशाहीच्या नादाला लागून भौतिक कामिक गोष्टींचा नाद करणे हे सुख आणि समाधान प्राप्तीचे घोतक होऊ शकत नाही आणि मानवाला जगायला तंत्रज्ञानापेक्षाही त्या गोष्टींची अधिक आवश्यकता असते चंद्रावर पोचणाऱ्या आपल्यासारख्या देशाला भूतान सारखे सुंदर पर्यावरण आणि आनंदी चेहरे तयार करणे अवघड जाते कारण त्याला तंत्रज्ञान नाही ना फॅक्टरी ची आवश्यकता असते तेथे मानवी मनाच्या सुंदरतेची निकड असते. हे आपल्यासारख्या अध्यात्माचा मजबूत पाया असलेल्या देशाला उमजत नाही ही या भूमितीची शोकांतिका आहे.
शिरीष प्रभाकर चव्हाण
संपादक : दि सेपिअन्स न्यूज तथा RTI ऍक्टिव्हिस्ट




