अजून पर्यंत एक गोष्ट उमजत नाही की, महिलांना श्री पवनपुत्र हनुमानजींची मंदिर पूजा का वर्ज्य आहे. कदाचित ते ब्रह्मचारी असल्याने असावी. परंतु त्यांच्या जीवनाचे वंदन केले तर त्यांनी आपले जीवन श्रध्दा भक्तीचे समर्पण तर माँ सीता माते ज्या एक महिला होत्या त्यांच्या सहाय्यासाठीच समर्पित केले. जर हे सत्य असेल तर महिलांचे रक्षण करते म्हणून त्यांचा लौकिक असावा. मागे वळून पाहता धर्ममार्तंडांनी महिलांना त्यांच्या आशीर्वादापासूनच तोडले आहे. जो आमच्या मते महिलांवरती सर्वात मोठा अन्याय आहे. इतिहासात काय झाले यापेक्षा पुढे काय करावे हे आम्ही इथे सुचवू शकतो आणि ते आहे महिलांनी सर्वप्रथम हनुमानजींचीच पूजा करावी. कारण महिलांचे सर्वात मोठे रक्षक हितचिंतक हे हनुमानजी आहेत असे आम्हाला वाटते. आम्हाला विश्वास आहे जर कुण्या महिलेने अनुमानींची खरोखर भक्ती भावी पूजा केली तर त्यांना समाजात असलेले राक्षस, नीच, कावेबाज स्वतःच्या क्षमतांवर आवाज हवी अहंकार असलेले रावण स्पर्श ही करू शकणार नाही. तसे केल्यास त्यांचा अंत निसंशय निश्चित आहे.





