The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

एक मार्मिक विश्लेषण : नोकरी आणि बारा भानगडी

अनेकदा विचार येतो नौकरी व्यक्तीला काय देते आणि हो त्या मोबदल्यात काय घेते. मला व्यक्तिशः हे वाटते की नौकरी आपला स्वाभिमान आत्मसन्मान आयुष्यातील बहुमोल काळ घेते आणि त्या बदल्यात दर महा एक ठरावीक रक्कम देते आपला समज असतो की आपण नोकरीत जे ठरवून दिलेल काम करतो म्हणून नौकरी आपल्याला वेतन देते. परंतु सत्य हे की वेतन त्याच नसतच मुळी वेतन असते जी हुजुरी बटरिंग व आलेले बेकायदेशीर आदेश पाळण्याचं. का खोटे वाटते ? मग एकदा फक्त साहेबांनी दिलेल्या बेकादेशीर आदेशांना नाही म्हणून पहा. तुमचा स्वाभिमान जपण्याचा इवलुसा प्रयत्न करा, शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत नोकरीवर जा आणि या मग कळेल आपल्याला वेतन कसले मिळते आहे. खरंतर आज अनेक शासकीय सेवक हे जनतेची सेवक नसतात ती वरिष्ठांची मर्जी सांभाळणारी भावली असतात. विशेष म्हणजे ती मर्जी इतकी डेलिकेट असते की या हातावरून त्या हातावर घेताना देखील जिव ओतून काळजी घ्यावी लागते. जर साहेबांच्या इगोला .01% जरी धक्काच नाही स्पर्श झाला तरी नौकरदाराची खैर नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की अशा नोकरीत तुमची सृजनशीलता कलात्मक बुद्धी हीचा ऱ्हास होतो. मी असे अनेक लोक पाहतो आहे ज्यांना अनेकदा नको नको होते परंतु उत्पन्नाचा दुसरा सोर्स नसल्याने व नोकरीच्या सुरुवातीच्या काळात आर्थिक नियोजन शून्य असल्याने पुढचा काळ कठीण जातो अगदी मन मारीत. आणि हे देखील इथे स्पष्ट करतो नोकरी व्यक्तीच करावीच लागते कारण लोक खोटे सांगतात की व्यक्ती ऑक्सिजनवर जगतो खरंतर व्यक्ती पैशावर जगतो आणि तो जर नसेल तर ऑक्सिजन असूनही काही उपयोग नाही. याला पर्याय एक आणि एकच नोकरी लागण्याआधी तुमच्या मनाने नोकरी सोडण्याची तारीख निश्चित करा आणि त्यानुसारच योग्य.आर्थिक नियोजन करा. जे खरोखरच खूप अवघड नाही. हो फक्त सुरवातीच्या काळात वायफळ गोष्टींवर चा खर्च टाळावा लागतो.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts