तुम्हाला मोर आणि गिधाड यात कोण आवडेल नक्कीच उत्तर असेल मोर. मग सामाजिक दृष्टीने या दोघांपैकी उपयुक्तता कुणाची तर कुणीही सुज्ञ व्यक्ती म्हणेल गिधाड कारण सृष्टीने गिधाडाला क्लिनिंगचे काम दिले आहे. असे क्लिंगिंग जे मनुष्यच काय जगात कोणताही प्राणी करीत नाही ना मशीन. जगात गिधाड सोडून असा एकही प्राणी नाही जो उष्ठेच नाही तर सडलेले शरीरास अपायकारक असलेले रोगट किडलेले सर्व खाऊन साफ करतो आणि हो प्रत्येक प्राण्यास काय खावे अथवा काय खाऊ नये याचा विधिनिषेध आहे. पण गिधाडाला नाही. कारण ते स्वच्छतादूत आहे या सृष्टीचा मृत उंदीर,,वाघ साप असो की हत्ती त्यांच्या हाडांना खाऊन पचवणारा पक्षी गिधाड आपले काम निमूट कोणत्याही विशेष वागणुकीच्या अपेक्षा विना करणारा प्राणी. ज्याला अनेकदा समाजाकडून अतिशय तुच्छ व स्थापत्य वागणूक मिळालेला पक्षी. त्याला ना कुणी प्रेम करीत ना पाळीत ना 2 घास काढीत. आपल्या समाजात उपद्रवी उंदीर कावळा (ज्याला आपण पितृपक्षात आपला बाप ही मानतो) अगदी चुचुंद्रीला ही धार्मिक अधिष्ठान आहे परंतु गिधाडास नाही. मग प्रश्न हा की असे का ? उत्तर सरळ आहे. मानवी समाज दिसण्यावर भुलतो वस्तुस्थितीवर नाही. असे नाही की वस्तुस्थिती त्याला दिसत नसते परंतु तो ती दुर्लक्षित करतो. त्याचे उत्तम उदा. म्हणजे पादत्राणे आणि फेटा वा टोपी पादत्राणे नसली तर व्यक्ती चार पावले ही घरा बाहेर टाकीत नाही ती आपले केवळ पाय घाणी पासूनच स्वच्छ ठेवीत नाही तर इजा होण्यापासूनही वाचवितात अगदी स्वतः खराब होऊन तरी आपण तिला महत्व देतो. जसे दूधवाला,कामवालीबाई, चप्पल शिवनारा उपेक्षित असतो आणि समाजाला कोणताही उपयोग नसलेल्या विषयात पीएचडी करणाऱ्याला अधिक मान असतो आणि दुर्दैवाने वेतन देखील. खरंतर पीएचडी विना चप्पल शिवणारा अथवा दूधवाला वॉचमन किंवा सफाई कामगार राहू शकतो आणि समाज देखील परंतु पीएचडी धारक वरील सर्वांशिवाय राहू शकत नाही तरी तो स्वतःला श्रेष्ठ समजतो निखालस दांभिकपणा.





