01
सिरसा: तुम्ही तुमच्या आयुष्यात हायवेवर किती टायर असलेले ट्रक पाहिलेय? 6, 8, 10, 16… किंवा जास्त. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजकाल हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील रस्त्यांवर एक ट्रक आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलाय. मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक गुजरातमधील कांडला बंदरातून 10 महिन्यांपूर्वी निघाला होता, जो पंजाबमधील रिफायनरीमध्ये जाणार आहे. अनेकदा तुम्ही हायवेवर ट्रक धावताना पाहिला असेल, पण हा बाहुबली ट्रक धावत नाही तर रेंगाळत चाललाय.