माजी समाज कल्याण मंत्री व शिवसेनेच्या प्राथमिक फळीतील शिवसैनिक बबन घोलप यांनी देखील आज उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आपले म्हणणे मांडले आहे.
शिवसैनिक पदाचा राजीनाम देतांना त्यांनी आपले म्हणणे या प्रकारे मांडले
मी आज माझ्या शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देत आहे. कारण आजपर्यंत शिवसैनिक म्हणुन मी निष्ठेने व ईमानेईतबारीत काम केले आहे. मला पक्षाने जे जे सांगितले, ते प्रामाणिकपणे केले. पण अचानकपणे शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुखपदावरुन काढुन मला अपमानित करण्यात आले, व मी ज्यांना निष्क्रीय पदाधिकारी म्हणून काढुन टाकले होते व नविन पदाधिकारी नेमले होते त्यांनाही बदलण्यात आले, हे कितपत बरे आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकनिष्ठ शिवसैनिक अमर कतारीला कुठेच ठेवले नाही. ज्या सहा विधानसभा संर्पकप्रमुखांनी लेखी कळवले होते, की हे जुने पदाधिकारी कसे बिनकामाचे, विकाऊ आहेत. ते लक्षात येऊन सुध्दा त्यांना परत घेऊन पदे दिली. हे सर्व पाहुन मी अचंबित आहे. नेमके माझे काय चुकले, ते समजले नाही. मी याबाबत दादही मागितली पण काहीच उत्तर मिळाले नाही आणि माझी वकीली करणारेही गप्प आहेत. त्यामुळे आपण थाबुन घेणे महत्वाचे वाटते. म्हणुन मी माझा शिवसैनिक पदाचा
राजीनामा देत आहे.
आपला,
बबन घोलप