नाशिक : सहा दिवसांपूर्वी राहुल गांधीं यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली. त्याच अनुषंगाने नाशिक शहरात राहुल गांधींचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. परंतु या रोड शो दरम्यान चोरट्यांनी नाशिककरांच्या खिशाला कातरी चांगलीच मारली. यात तब्बल साडे तीन लाखांचा ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला.
याबाबत पोलीस ठाण्यात नोंद झाल्यानंतर चोरीस गेलेल्या ऐवजाची रक्कम जी समोर आली त्याने भले भले आवक झाले. पोलीसांच्या माहितीनुसार चोरट्यांनी 363000 चा ऐवज चोरल्याचे समोर आले आहे.