नाशिक। प्रतिनिधी Nashik
सुरगाणा तालुक्यातील दोन गावांचे रस्ते पूर्ण झाल्याच्या मोबदल्यात दोन तक्क्या प्रमाणे चाळीस रुपये लाच ठेकेरारकडून स्वीकारतांन काल दिनांक ९ मे रोजी जिल्हा परिषद अभियंता नंदलाल विक्रम सोनवणे (५५) यास ACB च्या पथकाने मुबंई नका येथील त्याच्या घरी रंगेहात पकडले.
या प्रकरणी मुबंई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे, गणेश निंबाळकर, नितीन नेटारे यांनी कारवाई केली.