The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

अतीश छगन भोईर जिल्हा शासकीय रुग्णालयाचा लिपिक ACB च्या जाळ्यात

मेडिकल बिल मंजूर करून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाच हजारची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिनांक ०७ शुक्रवार रोजी सायं ६ वा. जिल्हा शासकीय रुग्णालयात अटक केली. अतीश छगन भोईर (वय ४५, रा. मानसी व्हिला बी, बनारसी नगर, हिरावाडी, पंचवटी) असे अटक केलेल्या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे.

भोईर हा जिल्हा रुग्णालयात वर्ग तीनचा कनिष्ठ होता नेमणूक आहे. तक्रारदाराच्या पत्नीचे सिझेरिअन झालेले असून, औषधोपचाराचा वैद्यकीय खर्च ९२३७९ रुपये झाला. या वैद्यकीय बिलाची फाईल तक्रारदाराने शुक्रवारी सामान्य रुग्णालय नाशिक येथे सादर केली.

त्यावेळी भोईर याने वैद्यकीय बिलाची फाईल पुढील कार्यवाही करून लवकर आणून देण्यासाठी तक्रारदाराकडे एकूण बिलाच्या ६ टक्क्यांप्रमाणे  ५५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ५ हजार रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयाकडे तक्रार केली.

त्यानुसार शहानिशा करून पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून जिल्हा रुग्णालयातील दालनामध्ये सायंकाळी ६ वाजेदरम्यान ५ हजार रुपयांची लाच घेताना पथकाने भोईर यास अटक केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.