The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

स्वस्वार्थासाठी महामानवाच्या फोटोचीच विटंबना ? मानवतेच्या देवदूताने याचसाठी केला होता का एवढा जागर ?

संबंधित बातमी ही पोलिस आयुक्त नाशिक शहर यांच्या प्रेसनोटच्या आधाराणे व अनूषंगाने देण्यात आली आहे

नाशिक : पंचवटी येथे अमोल चंद्रकांत सोनवणे या व्यक्तीने केलेला हा प्रकार ( पोलीस आयुक्त नाशिक यांच्या प्रेस नोटच्या संदर्भाने ) अतिशय निंदनीय आणि धक्कादायक असून अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी कायदेशीर जी ही कारवाई करायला हवी ती केलीच पाहिजे ही मागणी द सेपियन्स वृत्तपत्र करते. या प्रकारामुळे हे नक्कीच निष्पन्न झाले की मनुष्य क्षुल्लक स्वस्वार्थासाठी किवा सूडबुद्धीने महापुरुषांचा देखील किती वाईट प्रकारे उपयोग करून घेतो. तसेच दोन समाजात, मानवतेत तिढा निर्माण करण्यासाठी किती खालच्या थराला जाऊ शकतो आणि असे लोक प्रत्येक जाती धर्मात आहेत म्हणून त्याच जाती धर्मातल्या प्रत्येक सगुनी बांधवांनी पुढे येऊन या घटनेचा निषेध नोंदवावा. तसेच कायद्यानेही या संदर्भात अधिक कठोर कारवाई करून असे स्वस्वार्थासाठीचे गलिच्छ प्रकार भविष्यात होऊ नये यासाठी काहीतरी अतिशय कठोर उपाय योजना कराव्या.

अमोल सोनवनेने केलेला हा प्रकार अतिशय निंदनीय असून त्याला कोणत्याही प्रकारची माफी नाही. त्याने संबंधित व्यक्तीला अडचणीत आणण्यासाठीच हा प्रकार केला नसून त्याने बाबासाहेबांसारख्या महापुरुषाला आणि त्याच्या कर्तुत्वाला या पत्रकातील बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची विटंबना केली आहे. तेही स्वस्वार्थासाठी बापाचीच विटंबना करण्याचे हे कृत्य मन हेलावून टाकणार आहे.
त्याने जर हे पापकर्म केले असेल तर ते अतिशय घृणास्पद असून अशा वृत्तीला मग ती कोणत्याही समाजाची असो कठोर शासन होणे ही काळाची गरज आहे.

संबंधित पत्रकात अतिशय कावेबाजापणे दोन समाजात तिढा निर्माण करण्याचा तसेच बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या प्रतिमेची विटंबना करण्यात आली असून तो आम्ही आमच्या वाचकांना एक जबाबदार वृत्तपत्र व वृत्त संकेतस्थळ म्हणून दाखवू इच्छित नाही.