The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

फागणे: चार हजार रुपयाच्या लाच प्रकरणात ग्रामविकास अधिकाऱ्या सरपंचाचे पती, शिपाई व रोजगार सेवक ACB जाळ्या

फगणे धुळे : घराचा नमुना नंबर आठ अद्यावत उतारा देण्या करीता चार हजार रुपयाच्या लाच प्रकरणात धुळे जिल्ह्यातील फागणे येथील ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब नामदेव पाटील यांच्यासह शिपाई, रोजगार सेवक व सरपंचाचे पती लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकले.

या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी फागणे येथे सरकारी जागेत अतिक्रमण करून बांधलेल्या घराची जागा महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या धोरणानुसार नियमाकुल करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सदर घराचे नमुना आठच्या उताऱ्यावर मालकी हक्कात सरकारी अतिक्रमण अशी नोंद कमी करून तक्रारदार यांना त्यांच्या घराच्या नमुना नंबर आठ अद्यावत उतारा देणे करीता तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी ला प्र.वि. धुळे कार्यालयात तक्रार दिली.