अमेरिकेतील मिशेल थेरेसा ड्वोरॅक आणि युनायटेड किंगडमच्या फे जेन मॅनर्स या दोन परदेशी महिला गिर्यारोहकांची रविवारी सकाळी सुखरूप सुटका करण्यात आली. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील चौखंबा तिसरे शिखर गाठण्याच्या प्रयत्नात गिर्यारोहक ६,०१५ मीटरवर अडकून पडले होते.
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील चौखंबा येथे गुरुवारी अडकलेल्या दोन परदेशी गिर्यारोहकांचा शोध भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने शुक्रवारी सुरू केला.येथील स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर (SEOC) कडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 8 वाजता परदेशी गिर्यारोहकांची शोध मोहीम सुरू करण्यात आली.
या संदर्भात माहिती मिळताच चमोलीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री ११ वाजता गिर्यारोहकांच्या हेली बचावासाठी भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाला (डीएमए) निवेदन पाठवले.