विधानसभा निकालाने जरांगे पाटलांची वा मराठ्यांची हार झाली का ? तर अजिबात नाही त्याच विश्लेषणात्मक कारण हे की, महाराष्ट्रात आजही सर्वात श्रीमंतच नाही तर प्रभावशाली जात जर कुठली असेल तर ती मराठाच आहे. या जातीला तोडून त्यांची लोक नाकारून कुठलाही पक्ष आपले अस्तित्वच टिकवू शकत नाही. मागे ही तीन मुख्य पदात एक मुख्यमंत्री व एक उपमुख्यमंत्री हे मराठेच होते वा BJP स करावे लागले. ज्या राज्याच्या राजकारणात सरपंचा पासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत नेते हे मोठ्या संख्येने मराठाचं असल्यावर मराठा हरेलच कसा ? खरंतर ना मराठा हरला ना पडला ना कमी झाला. त्याला पर्याय न शोधता आल्याने त्याला इतर समाजापासून तोडू पाहणारी मंडळी हरली, हतबल झाली जे उमेदवारी देतांना ही मराठाच द्यायला लागल्याने त्यांना ही जाणवले व अवघ्या महाराष्ट्राला ही. मग जरांगेंच्या संदर्भाने कोण हरला ? तर गोरगरीब अनेक वर्षे दारिद्र्यात असलेला हतबल होऊन जरांगेंच्या साथीने काही मिळवू पाहणारा गरीब मराठा हरला. त्याच दुर्दैव हेच की तो म्हणतो BJP ने त्याची फसवणूक केली पण सत्य त्याही मागे आहे त्याची फसवणूक सर्वप्रथम केली ती त्याच्या घरातील नेत्याने. वर्षानुवर्षे सत्तेत असूनही त्याने या लेकरांसाठी काहीही केले नाही म्हणून दोष घ्यायचाच झाला तर 100% दोष फडणवीसांना न देता त्यातील 70% दोष आपल्या नेत्यांना देणं येथे क्रमप्राप्त आहे.
राहता राहिला जरांगेनचा वा गरीब मराठ्यांचा प्रश्न तर लढा लढण्याच्या नितीत काही बदल आवश्यक आहे. पण लक्षात ठेवा मराठा ना कधी हरला, ना हरेल. हो पण त्याच्या घरातून मोठा झालेल्याने घरात आणलेली संपत्ती एकट्यानेच खाल्याने व त्याच्या हे आत्ता आत्ता लक्षात येवू लागल्याने अजून काही काळ तळमळेल हे नक्की आणि एक आरक्षण नक्कीच मिळावे नी मिळेल पण आरक्षण हा एकमेव समृद्धीचा मार्ग नाही हे ही ध्यानी घ्याव लागेल. एकमेकास साथ देत इतर समाजाला ही बरोबर घेऊन अधिक छान समृद्धी मिळू शकते हे ही ध्यानी घ्यावं लागेल.
शिरीष प्रभाकर चव्हाण
संपादक : दि. सेपिअन्स न्युज