The Sapiens News

The Sapiens News

संपादकीय : गोष्ट एका सुंदर,सुसंस्कृत,शालीन लग्नाची

दोन दिवसांपूर्वी एक कॉल आला समोरुन कॉलेजातील मित्र बोलत होता. म्हणाला मुलीचे लग्न आहे 24 तारखेस त्याच्याच अमंत्रणासाठी कॉल केला. मी ही म्हंटले नक्की येईन आणि आज लग्नाला जाने झाले. आता आपण म्हणाल ही काय बातमी होऊ शकते का ? लग्नच तर आहे ते तर होतच असते. नक्कीच आपलं खरं आहे. परंतु हे लग्न जरा आगळवेगळ वाटलं आणि याची बातमी आवर्जून करावी याची मनापासून इच्छा झाली. मग काय होतं या लग्नात असं की या लग्नाची बातमी व्हावी ? तर तेही सांगतो त्या पूर्वी सध्या होणारी लग्ने कशी असतात हे नमूद करणे येथे क्रमप्राप्त होते. तेव्हाच मी सांगत असलेल्या लग्नाचे वेगळेच नाही तर सुसंस्कृतपण लक्षात येईल.

अनोखा लग्नसोहळा

आजची होणारी लग्नसमारंभ
अवाढव्य खर्च अश्लील व कर्कश आवाजातील गाणी, त्यावर नाचणारी माफ करा धांगडधिंगा करणारी पुरुषच नाही तर महिला ही, त्यात काही मद्यपी ही, मुख्यद्वारापासून ते मंचापर्यंत नवरानवरीच्या पुढे कला किवा नको ती कला वा नाचगाणे करणारी खास पैसे देऊन मागावलेली मंडळी नी त्यांचा बटबटीत सिंगार, मंचाच्या दोन्ही बाजूस लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर प्रिविडिंग शूटचे वायफळ व नको ते pics. जे आबालवृद्धांबरोबरच काय आपल्या मुलांबरोबर ही न पाहावे अशी पालकांची होणारी फसगत, इनशॉर्ट सगळं ओंगळवाण. हे असलं दृश्य आजच्या लग्नात पाहावं लागतं आपल्याला. म्हणून कुणाची पत्रिका आली की नको नको होतं जायला आणि म्हणूनच मी काल जे लग्न अटेंड केल ते  वेगळं होत कारण त्यात वरील ट्रेंड समजलं जाणार असं काही ही नव्हतं.

मग काय होते असे वेगळे या लग्नात ?
जेव्हा आम्ही कार्यालयात प्रवेश केला तेव्हा लागलीच जाणवलं लग्न सुसंस्कृत आहे. प्रवेशद्वारात स्वागतासाठी उभी असलेली मंडळी अतिशय सुंदर पण साध्या वेशात हसतमखाने सर्वांचे स्वागत करीत होती. आतमध्ये लॉनमध्ये गेल्यावर जाणवले मंच ही सुरेख सजवलेला होता अगदी रंगसंगतीत ही तो जाणवत होता. लग्न लागण्यास वेळ असल्याने मित्रांशी गप्पा मारताना समोरच असलेल्या स्क्रीनकडे आवर्जून लक्ष जाई. त्यात जरा मी चिकित्सक असल्याने लग्नापूर्वी झालेल्या सोहळ्याचे pics निरखून पाहिले लागलीच लक्षात आले सर्व pics समाज भान राखत व संस्कृती जपत काढण्यात आले आहे, अगदी नवरा नवरीचेच नाही तर इतरांचे ही शूट करतांना हवी ती काळजी दोन्ही बाजूच्या मंडळींची घेतली होती. नको त्या व ओंगळवाण्या गोष्टींना फाटा देत मात्र नवरा नावरीचेच नाही तर परिवारातील सर्वांचे विशेषतः वृद्धांचे अतिशय सुंदर pisc घेण्यात आलेले जाणवले. ते पाहू डोळे सुखवता ती काय. नवरा नवरीचे आगमन झाले ते पाहिल्यावर तर आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. एका छोटीचा सजवलेल्या रथ वजा गाडीत बसून त्यांचे आगमन झाले. त्यांच्या पुढे सांस्कृतिक गाण्यावर अतिशय सुजाण नाच करणारी पारंपरिक वेशातील तरुण मुले मुली नाचत होते हातात मशाल, धूप व भगवे ध्वज घेतलेली ही मुले जव्हा “बजावो ढोल स्वागतं मे मेरे घर राम आये है” व तत्सम गाण्यावर नृत्य करतांना पाहून उपस्थित पाहुणे मंडळी मंत्रमुग्ध झाली.

एक सुंदर प्रसंगाची आठवण
तसेच हा लग्न सोहळा पाहून उपस्थित पाहुणे मंडळीना एक सुंदर प्रसंगाची आवर्जून आठवण झाली आणि तो प्रसंग म्हणजे अयोध्या येतील प्रभू रामांच्या मूर्तीचा प्रतिष्ठापणा दिन आणि हो ही अतिशोक्ती नाही. विशेष म्हणजे उपस्थितांमध्ये एकच चर्चा होती अशाच पद्धतीने आपले लग्नसोहळे, समारंभ, सण व उत्सव साजरे झाले तर पुढील पिढीला संस्कार व संस्कृती संवर्धनासाठी वेगळं काही शिकवीण्याची काही गरज नाही. आत्ता प्रश्न हा की यारून किती लोक प्रेरणा घेतील व किती तीस प्रत्यक्षात अंमलात आणतील. नाही का ? 

संपादक : शिरीष प्रभाकर चव्हाण : दि. सेपिअन्स न्युज

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
Coming Soon
Do You Like Our Website?
UPSE Coaching

Recent Posts