आंध्र प्रदेशातील 52 वर्षीय जलतरणपटू गोली श्यामला हिने समुद्रात 150 किलोमीटर पोहून इतिहास रचला. विशाखापट्टणम ते काकीनाडा हा आव्हानात्मक प्रवास पूर्ण करणारी श्यामला ही पहिली आशियाई महिला ठरली आहे. 28 डिसेंबर रोजी त्यांनी विशाखापट्टणममधील आरके बीच येथून प्रवास सुरू केला आणि 5 दिवसात सूर्यरावपेट एनटीआर बीच (काकीनाडा) येथे पोहोचून आपले यश नोंदवले. श्यामला दररोज 30 किलोमीटर पोहायची आणि तिच्या या प्रवासातून तिने महिलांसाठी एक प्रेरणास्थान बनून एक आदर्श निर्माण केला. राम सेतू, श्रीलंका आणि लक्षद्वीपमध्ये पोहणारी श्यामला तिच्या अदम्य इच्छाशक्ती आणि धैर्यासाठी ओळखली जाते. हैदराबादची हि जलतरणपटू जिद्द आणि लवचिकतेचे उदाहरण बनली आहे. पण लोक फक्त रील्स वर नाचऱ्या मुलींनाच लाईक करतात. अशा कौशल्याकडे सर्वजण दुर्लक्ष करतात. एक लाईक यांच्यासाठी सुद्धा ठोका.
Vote Here
Recent Posts
एक गणित : मस्साजोग, धस नी फडणवीस
The Sapiens News
January 7, 2025
तिबेटमध्ये शक्तिशाली भूकंप, नेपाळमध्ये सुमारे 100 जणांचा मृत्यू
The Sapiens News
January 7, 2025
जलतरणात श्यामलाचा 150 किमी पोहून विक्रम
The Sapiens News
January 6, 2025
“आपल्या देशात आता 1000 किमीपेक्षा जास्त मेट्रो नेटवर्क आहे”: PM मोदी
The Sapiens News
January 6, 2025