The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

संपादकीय : वृद्धांची विदारक स्थिती

आज SBI ला गेलो असता एक आजी रडतांना दिसल्या. विचारले तर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे बंद झाल्याचे कळले मी त्याची कागदपत्र घेऊन संबंधित ऑफीसमध्ये गेलो. तेथील लिपिकांनी सांगितले आजींचे आधार डिस्लिंक झाल आहे म्हणून पैसे जात नाही ते बँकेतून लिंक करावे. मी पुन्हा बँकेत आलो. मॅनेजर यांना विचारणा केली त्यांनी तात्काळ त्यांच्या माणसांना सांगितले. जेव्हा आजींचे अकाउंट चेक केले तर ते त्या शाखेतच नव्हते. मी त्याची शाखा विचारली तर रविवार कारंजा सांगितली आता बिकट प्रश्न त्यांना तेथे घेऊन कोण जाईन माझी कार होती परंतु घेऊन जाताना त्यात आजींना काही झाले तर त्यांना मदतीला ही न आलेले वाऱ्यावर सोडून दिलेले मुले नातवे सुना काहीही विचारपूस न करता मलाच दोषी ठरवतील व प्रसंगी तोंडी पाणी करायला धावत येतील. ज्यांना याच आजीने अतिशय लाडात कष्टात वाढविले. अनेकदा नवऱ्याला ही विरोध करून मुलांना साथ दिली. अनेकदा याच मुलांसाठी जगाशी पंगा घेतला अगदी स्वतःच्या म्हातारपणाची काहीही तजवीज न करता आणि त्यांनीच यांना वाऱ्यावर करदात्यांच्या व शासनाच्या उरावर सोडले. एवढ्या उन्हात ह्या आजी पायी जावू नये म्हणून मी रिक्षा करून दिली कारण म्हातारपणात त्यांच्यात ना शक्ती होती ना पिशवीत पैसे. अक्षरश भीक मागावी अशी स्थिती. त्यातच त्यांच्या रडण्याने आपल्यासारख्यांना कळवळा परंतु त्या आहे की नाही याचं त्यांच्या घरच्यांना सोयर सुतक देखील नाही. खरं सांगू यात सर्वस्वी चूक या म्हाताऱ्या लोकांची. यांनी आपली संपत्तीच नाही तर आयुष्य लावलं मुलांसाठी पण स्वतःच्या गाठीला चार पैसे म्हातारपणासाठी राखून ठेवले नाही तुम्ही पहा बहुतांश म्हातारी व्यक्ती ज्यांच्याकडे गाठीला चांगले पैसे आहे ते धमाल जीवन जगतात आणि त्यांना त्यांची मुले देखील जीव लावतात का याचं कारण येथे द्यायला नको…..

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts