The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

जितेंद्र शेळके अपघात, खरात आणि अप्रगल्भ असंवेदनशील राजकारण आणि TRP चा गलिच्छ खेळ

टीप : हा अग्रलेख कुणाची बाजू घेणे अथवा कुणाला दोष देणे या हेतूने प्रेरित नसून तथ्य व वस्तुस्थिती मांडण्याकरिता केलेला एक छोटासा प्रयत्न आहे.

पार्श्वभूमी : दिनांक 17 मार्च 2026 रोजी शिर्डीचे ख्यातनाम शिक्षणतज्ञ तसेच उद्योगपती व मूळचे शेतकरी कुटुंबातून आलेले जितेंद्र शेळके यांचे व त्यांच्या सुविद्य पत्नी यांचे शिर्डी जवळ अपघाती निधन झाले. यात हे दांपत्य दगावले आणि त्यांचा बारा वर्षाचा मुलगा हा  गंभीररित्या जखमी आहे. ज्याला पुणे येथील एका इस्पितळात दाखल केले आहे. त्याच बरोबर वृत्तवाहिन्यांवर तसेच समाज माध्यमात या अपघाताच्या चर्चांना उधाण आले. येव्हाना अवघ्या महाराष्ट्राला माहीत देखील नसलेले जितेंद्र शेळके हे नाव जे सर्वत्र ट्रेंड होऊ लागले. दुर्दैवाची बाब ही आहे की ते नाव ज्या अनुषंगाने पद्धतीने आणि असवेदनशीलपणे चर्चिले गेले त्या पाठीमागे समाजातील गणमान्य प्रतिष्ठित म्हणविणाऱ्या लोकांना अगदी दुर्दैवी घटनेचे देखील भांडवल करण्यात किती असूरी आनंद आहे याचा प्रत्यय आला. त्याचे कदाचित कारण संबंधित उद्योगपती जितेंद्र शेळके हे कुविख्यात असलेल्या अशोक खरात यांच्या शिवलीका ट्रस्ट उपाध्यक्ष म्हणून  संबंधित होते. कदाचित त्याचमुळे जितेंद्र शेळके व त्यांच्या पत्नीच्या मृत्यूचे नको ते तर्कवितर्क अतिशय असंवेदनशील पद्धतीने लोक नियुक्त नेते तसेच  प्रथीतयश म्हणून म्हणविणारे काही न्यूज चॅनल यांनी प्रकाशित केले. परंतु ते करताना त्यांना जितेंद्र शेळके व त्यांच्या पत्नी अनुराधा यांच्या पश्चात असलेल्या त्यांच्या अतिशय गोजिरवाण्या निरागस दोन मुली व अत्यावस्थ असलेल्या मुलाचा देखील विचार आला नाही. जे या समाजाचा गलिच्छ नागडेपणा चव्हाट्यावर मांडते. त्यामुळेच दि. सेपिअन्स न्यूज यांनी हा अग्रलेख लिहिण्याचे प्रयोजन केले.

कोण आहेत जितेंद्र शेळके व त्यांच्या पत्नी अनुराधा ?

जितेंद्र शेळके
शिर्डीत शेळके खानदानाचे नाव व अस्तित्व कालातीत असून. त्यांचे समाजकार्य देखील मोठे आहे. स्वतः शेतकरी कुटुंबातून आलेले जितेंद्र शेळके हे उच्चविद्या विभूषित असून डॉक्टरेट ही उपाधी असलेले उच्चशिक्षित व्यावसायिक आहे. त्यांनी किमान आठ वर्ष अमेरिकेत शिक्षण घेऊन तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून ज्या प्रामुख्याने श्री साई सेवा यांचा समावेश होतो, हे कार्य केले. साता समुद्रा पार साईनाम पोचवण्याचे श्रेय जा ही गणमान्य व्यक्तींना जाते त्यात जितेंद्र शेळके यांचा सिंहाचा वाटा आहे. विशेष म्हणजे घरची श्रीमंती व उच्च विद्याविभूषित असताना देखील त्याचप्रमाणे अमेरिकेत अतिशय सुलभतेने स्वतःचे आयुष्य विलासीपणे व्यतीत करू शकत असताना देखील त्यांनी आपल्या मायदेशी आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला. शिर्डीत आल्यानंतर देखील त्यांनी उद्योग व्यवसायाबरोबरच अनेक सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला ज्या त श्री साई शिर्डी परिक्रमा, ग्रीन शिर्डी हे उपक्रम वाखाण्याच्या जोगे आहेत. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात देखील त्यांचे मोठे योगदान असून त्यांची सिल्वर ओके नावाची प्रसिद्ध शिक्षण संस्था देखील आहे. ज्यात मुलांना भारतीय संस्कृती बरोबरच पाश्चात्य विज्ञान, क्रीडा व विविध सामाजिक उपक्रम शिकविले जातात. त्याचबरोबर शेतकरी सहाय्य व विविध उद्योगधंद्यात त्यांचा नियमित सक्रिय सहभाग राहिलेला आहे. जो शिर्डीच्या पायाभूत सुविधा विकसित करण्याकरिता योगदान देत आलेला आहे.

अनुराधा जितेंद्र शेळके
अनुराधा जितेंद्र शेळके ऊर्फ (कीर्ती अरुण देशमुख, माहेरचे नाव) ह्या जितेंद्र शेळके यांच्या सुविद्य शालीन व उच्चशिक्षित पत्नी होत्या. त्या मूळच्या नासिक येथील घनकर गल्लीत वाढलेल्या व स्वामी विवेकानंद विद्यालय पंचवटी तसेच केटीएचएम कॉलेज के के वाघ कॉलेज व धुळा येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बी ई (कॉम्प्युटरचे) उच्च शिक्षण घेतलेल्या एक शालिनी व सुसंस्कृत महिला होत्या. ज्यांनी जितेंद्र शेळके यांच्या प्रत्येक सामाजिक शैक्षणिक उपक्रमात खांद्याला खांदा लावून योगदान दिले. विशेषता शिक्षण क्षेत्रात त्यांनी अनेक नवनवीन प्रयोग त्यांच्या सिल्वर ओक शाळेच्या माध्यमातून केले. ज्या संस्थेवर त्या संचालक म्हणून नियुक्त होत्या. घराची व मोठ्या खानदानाची जबाबदारी लिलया पेलून एक सामान्य व मध्यमवर्गीय घरातील मुलगी एका प्रसिद्ध शाळेची संचालिका व सामाजिक कार्यकर्ता होणे ते ही आपल्या सचोटी, बुद्धिमत्ता व परिश्रमाच्या जोरावर ही अत्यंत  प्रेरणादायी गोष्ट आहे. तेही स्वतःच्या मुलांना सुयोग्य संस्कार व उच्च शिक्षण देऊन.

या दाम्पत्यांची एवढी मोठी सामाजिक शैक्षणिक व औद्योगिक ओळख असताना देखील त्यांचा दुर्दैवी अपघात झाल्यानंतर  समाजाने ज्यात काही मीडिया हाऊस व राजकीय नेते देखील येतात ज्यांनी जाणते अजाणतेपणे केवळ या दांपत्यांचे विशेषता जितेंद्र शेळके यांचे खरात कनेक्शनच पाहण्यात आणि जोडण्यात स्वारस्य दाखवणे. हे अत्यंत असंवेदनशील व  अपरिपक्व समाजाचे  घोतक नाही का ? तेही संबंधित विषय न्यायप्रविष्ट असताना ? जितेंद्र शेळके यांच्या संबंधित कुठलेही ठोस पुरावे समोर आलेले नसताना व ते व त्यांच्या पत्नी काळाच्या पडद्याआड मावळले असताना असा अपप्रचार करणे कितपत योग्य आहे ? भविष्यात खरात प्रकरणात अनेक गोष्टी उघड होतीलच परंतु त्या फॅब्रिकेटेड असण्याचीच शक्यता अधिक वाटते त्यातच या प्रकरणात अनेक प्रतिष्ठित घराणी विविध पक्षीय नेते मंडळी आयएएस आयपीएस सारखे उच्च पदस्थ अधिकारी अडकले असताना या प्रकरणाचे तेलगी व हर्षद मेहता होणार नाही हे कथन करणे धाडसाचे असेल.

या प्रकरणात अनेक नेतेमंडळी व नोकरशाहा अडकले असल्याने कुण्या एका व्यक्तीला तेही त्याच्या मृत्यू पश्चात आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवणे तेही तपास पूर्ण होण्यापूर्वी व प्रकरण न्याय प्रविष्ट असताना हे अनाकलनीय आहे. अपघात की घातपात केवळ या दोन शब्दांवर कुणाच्या मृत्यूचा बाजार मांडणे हे खरोखरच एक सभ्य समाज म्हणून क्लेशदायी वाटते. थोडा वेळ एखाद्या व्यक्तीने हा जरी विचार केला की यात जितेंद्र शेळके हे खरात प्रकरणात काही प्रमाणात दोषी जरी असेल तरी देखील त्यांना समाज माध्यमे काही वृत्तवाहिन्या व नेते मंडळी यांनी दिलेल्या सामाजिक  शिक्षेपेक्षा ती शिक्षा नक्कीच कमी असेल.
दि. सेपियन्स न्यूजचे एवढेच निवेदन आहे की कुणाच्याही दुःखाचे दुर्घटनेचे मृत्यूचे भांडवल करून बाजार मांडणे ही आपली संस्कृती नाही विशेषता तेव्हा जेव्हा संपूर्ण गोष्टी उघड झालेलल्या नसतात, संबंधित व्यक्ती अस्तित्वात नसतो त्याचबरोबर समाजाने हे देखील पाहावे की संपूर्ण जीवनक्रमात दगावलेल्या व्यक्तीने किती मोठे सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक कार्य करून समाजाला एक योगदान दिले आहे.

संपादक : शिरीष प्रभाकर चव्हाण
THE SAPIENS NEWS तथा RTI ACTIVIST

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts