थोडक्यात हकिगत :- यातील तक्रारदार यांचे अवनखेड शिवारातील ओमसाई पेट्रोल पंपाचे वार्षीक निरीक्षण करण्यासाठी त्यांनी ऑनलाईन शासकीय शुल्काच्या देयकाचे भरणा केलेले चलन प्राप्त करून ऑनलाईन पडताळणी बाबतचा अर्ज केला होता. त्या अर्जाप्रामणे तक्रारदार यांचे पेट्रोल पंपाची पाहणी करण्यासाठी आलेले वैध मापणशास्त्र, वणी विभागाचे निरीक्षक भगवान डोल्हारे याला पेट्रोलपंपाचे निरीक्षण करून पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे मोबदल्यात शासकीय शुल्का व्यतिरीक्त पेट्रोलपंपाच्या प्रती नोझल ६,०००/-रु. असे चार नोझलचे २४,०००/-रू. लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडले म्हणुन दिंडोरी पोलीस ठाणेस नमुद आरोपीता विरुध्द गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सापळा कारवाई
सापळा अधिकारी:- पोलीस निरीक्षक श्रीमती नेहा सुर्यवंशी, ला.प्र.वि. नाशिक मो. क्र.७७७४०११०७८
सापळा पथकः- पो. हवा/विनोंद चौधरी, पो. कॉ/अनिल गांगोडे
मार्गदर्शन
१) मा. श्री भारत तांगडे, पोलीस अधीक्षक
२) मा. श्री. माधव रेडी, अपर पोलिस अधीक्षक
३) मा. श्री. सुनील दोरगे, अपर पोलीस अधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
लाचलुचपत विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवका बद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक येथे संपर्क करावा.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक आपले सेवेशी सदैव तत्पर
संपर्क पत्ता :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
संकेतस्थळ :- acbmaharashtra.gov.in
ऑनलाईन तक्रार :- acbmaharashtra.net
ईमेल :- spacbnasik@mahapolice.gov.in
टोलफ्री क्रमांक :- १०६४,
दुरध्वनी क्रमांक :- ०२५३-२५७५६२८, ०२५३-२५७८२३०
व्हटसअॅप क्रमांक :- ९९३०९९७७००/ ९५४५०३१०६४




