आपण कर्ज घ्यायला घाबरतो आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती पहिला खरबपती ॲलन मस्क यावर देखील खर्ज आहे हे विसरतो. अगदी सर्व प्रकारचे जे वर आपण पाहू शकतात. म्हणजे जर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीवर ही कर्ज असू शकते तर मग आपण कोण ?प्रश्न हा आहे की एवढे पैसे असताना तो कर्ज का घेतो आणि तात्काळ फेडत का नाही तर त्याच एकमेव कारण आणि सूत्र हे आहे की जर घेतलेल्या कर्जाच्या व्याजापेक्षा अधिक पटीने गुंतवणुकीतून येणार व्याज मिळत असेल तर कर्ज घेणे काय वाईट आहे आणि ते का फेडायचं ? ॲलन एक रुपया व्याज देत असेल तर त्या पैशावर हजार रुपये व्याज घेतो. इकॉनोमी फायनान्स अतिशय सिम्पल लँग्वेज समजते. घेतलेली वस्तू परत करायचे वेळी ती स्वस्त पडली पाहिजे किंवा अधिक किमतीत विकली गेली पाहिजे. घेतलेल्या कर्जाच्या व्याजापेक्षा त्या पैशाची गुंतवणूक जास्त व्याज आणून देईल याची काळजी घेतली पाहिजे. सामान्य माणूस तेच करीत नाही. गुंतवणूक करण्यासाठी नाही तर ज्या गोष्टींच्या किमती घेतल्यानंतर कमी होईल पैसे खर्च करतो. म्हणून तो आयुष्यभर कर्जतही असतो आणि गरीब देखील असतो पैसे कमवणे खरोखर खूप अवघड नाही. परंतु आलेल्या पैशातून प्रगतीचा विचार हवा तो सामान्य लोकांकडून होत नाही आणि कर्ज झाले किंवा भौतिक गोष्टींचा लोभ वाढला तर ते अधिक कर्ज काढून फसतात किंवा भ्रष्टाचार लाचखोरी करून जेलमध्ये जातात आणि एक शोक करायला पैसे लागतात गरजा भागवायला खूप पैशाची आवश्यकता नसते. आजही देवाने ऑक्सिजन मोफत दिला आहे दोन वेळेचे जेवण आजही खूप महाग नाही पाणी देखील माणसाने विकायला काढलेले आहे देवाने नाही.




