The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

पो. प्र. केंद्र धुळे येथील आर्थिक अपहार कसा झाला ? गुन्हेगारी वृत्तीच्या कर्मचाऱ्यांची यंत्रणेच्या डोळ्यात धूळ फेक निलंबराची कारवाई सुरू…

संबंधित चारही कर्मचाऱ्यांवर धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा क्रमांक 283/26 कलम 318 316 संगमत 35 FIR नोंदवली आहे

दिनांक : 1/07/ 2026 रोजी धुळे शहर पोलीस ठाण्यात एक गुन्हा नोंदविण्यात आला हा गुन्हा पोलीस प्रशिक्षण धुळे येथील आर्थिक अपहार आणि गैरव्यवहार या संदर्भातील असून यातील मुख्य आरोपी हे अनुक्रमे क लिपिक जगदीश बुवा का लिपिक जगदीश सोनवणे, पोलीस कर्मचारी नरेश सोनवणे व मनोज खोंडे आहेत. या चौघांनी मिळून शासनाच्या तब्बल 1 कोटी 55 लक्ष रुपयांवर डल्ला मारला असून हा अपहार त्यांनी डिसेंबर 2024 ते एप्रिल 2026 या कालावधीत केला. जेव्हा प्रशासनाच्यावतीने ऑडिट करण्यात आले तेव्हा हा सर्व प्रकार लेखाअधिकारी दिनेश हिरामण भोई यांच्या निदर्शनात आला.

संबंधित गुन्ह्या संदर्भातील काही शासकीय माहिती

हा अपहार कसा झाला ?
वेतन व इतर दयेयके हे ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने कोषागार कार्यालयात पाठवले जातात. या महाशयांनी त्यांची वैयक्तिक वेतने व इतर भत्ते यांची देयके ही हार्ड कॉपीत वरिष्ठांच्या स्वाक्षरी पावेतो योग्य तयार केली आणि जेव्हा ऑनलाईन पाठवण्याची वेळ आली त्यावेळेला त्यांनी त्यांच्या संदर्भातल्या सर्व रकमा वाढून पाठवल्या. हा अपप्रकार डिसेंबर 2024 ते एप्रिल 2026 या कालावधी पावेत चालले. एवढे शातिर गुन्हेगारीवृत्तीचे व्यक्ती आजही शासनात आहे आणि ते शासनाशी व जनतेच्या करातून मिळालेल्या पैशाशी ज्या पद्धतीने खेळ करतात ते निंदनीय जरी असले तरी यात कुठेतरी अद्यावत यंत्रणेचा दोष आहे. 

या प्रकरणाचे मुख्य तपशील खालीलप्रमाणे आहेत:

  • काय घडले? : धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या ४ कर्मचाऱ्यांनी (लोकसेवकांनी) संगनमत करून शासनाचा तब्बल १ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी लाटला.
  • अपहार कसा केला? : डिसेंबर २०२४ ते एप्रिल २०२६ या कालावधीत या कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन ‘सेवार्थ’ (Sevarth) वेतन प्रणालीमध्ये बेकायदेशीरपणे फेरफार (Tampering) केला. कोणतेही देय नसताना, स्वतःच्या बँक खात्यांमध्ये खोटा ‘बेसिक एरियर्स’ (Basic Arrears) जमा दाखवून त्यांनी हा अपहार केला आणि प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकली.
  • झालेली कारवाई : धुळे शहर पोलीस ठाण्यात या कर्मचाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांन्वये फसवणूक आणि शासकीय निधीचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही संशयित कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील सुरू आहे.
  • पुढील तपास : या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी हा तपास धुळ्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) वर्ग केला आहे. पोलीस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथक आता या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.

यातील कनिष्ठ लिपिक जगदीश सोनवणे याच्या संदर्भात आमच्याकडे काही माहिती प्राप्त झाली असून ती लवकरच आमच्या वाचकांच्या समोर आम्ही ठेवू.