The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा व आषाढी एकादशी निमित्त नमस्ते नाशिक फाउंडेशन यांच्यावतीने अन्नदान व जलसेवा

श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा व आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त नमस्ते नाशिक फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने अन्नदान सेवा व जलवितरण सेवा आयोजित करण्यात आली.
वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांनी दिलेला अमूल्य संदेश आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे—
“सोन्या-चांदीचे दान क्षणिक असते; परंतु हरिनाम, ज्ञान आणि भक्तीचे दान चिरंतन असते.”
संत निवृत्तीनाथ महाराजांनी भौतिक संपत्तीपेक्षा हरिनाम, ज्ञान अन्न आणि भक्ती यांचे दान सर्वोच्च असल्याचा संदेश दिला. त्यांच्या शिकवणीनुसार दान म्हणजे केवळ वस्तूंचे वाटप नव्हे, तर आत्मोन्नती, समाजकल्याण, दया, करुणा आणि सेवाभाव यांचा स्वीकार होय. हरिनामाच्या आधाराने केलेली सेवा अधिक पवित्र, मंगलमय आणि फलदायी ठरते.
या सेवाभावी उपक्रमात वाघोली फाटा येथे संत निवृत्तीनाथ महाराज पालखीतील भाविकांसाठी तीन हजार हून अधिक पाण्याच्या बाटल्यांचे, व दोनशे हून अधिक चपात्यांचे तसेच पेपर नॅपकिनचे वाटप करण्यात आले. नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेहल देव तसेच संस्थेच्या सर्व सेवाभावी कार्यकर्त्यांनी मनःपूर्वक सहभाग घेतला. त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे हा पुण्यसोहळा अधिक मंगलमय आणि प्रेरणादायी ठरला.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts