आपत्तीच्या काळातही लोक पोलिसांना सहकार्य करीत नाही आणि ही खरोखर खेदजनक बाब आहे केवळ वाढलेले पाणी अथवा पूरस्थिती पाहण्यासाठी लोक गर्दी करतात ज्यामुळे ट्रॅफिक जाम होते, अनेक अपघात होतात आणि यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडतो. परंतु लोक समजून घेत नाही वाईट हे आहे की टोकलं तरी पोलिसांचीच वाद घालतात यंत्रणेची एकच इच्छा असते नागरिकांनी अशा स्थितीत घरात बसावं कुटुंबा बरोबर कॉलिटी टाईम स्पेंड करावा. परंतु लोक रस्त्यावर उतरतात यंत्रनेशी डोकं लावायला. प्रसंगी पोलिसांचा चोप खातात आणि नंतर पोलिसांनाच दोष नी शिव्या देतात. तुम्हीच सांगा पावसात ओले चिंब भिजणाऱ्या आणि 24 24 तास नोकरी करणाऱ्या पोलिसांची यात काय चूक असते ?





