आयएनएस निपुण (INS Nipun) हे भारतीय नौदलाचे स्वदेशी बनावटीचे डायव्हिंग सपोर्ट व्हेसल (DSV – पाणबुडी मदत आणि बचाव जहाज) आहे. खोल समुद्रातील डायव्हिंग, पाण्याखालील बचाव कार्य आणि आपत्कालीन स्थितीत पाणबुड्या वाचवण्यासाठी या जहाजाची रचना करण्यात आली आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये आणि क्षमता :-
निर्मिती: ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत विशाखापट्टणम येथील ‘हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड’ (HSL) द्वारे याची निर्मिती करण्यात आली आहे. यात सुमारे ८०% स्वदेशी साहित्याचा वापर झाला आहे.
आकार आणि क्षमता: हे जहाज सुमारे ११९ मीटर लांब असून त्याचे वजन (विस्थापन) १०,५०० टन आहे. हे जहाज सलग ६० दिवस समुद्रात राहू शकते.
खोल समुद्रातील डायव्हिंग: हे जहाज समुद्रात ३०० मीटर खोलीपर्यंत ‘सॅच्युरेशन डायव्हिंग’ ऑपरेशन्ससाठी सक्षम आहे. यासाठी जहाजात विशेष मूनपूल (पाण्याखाली थेट उतरण्यासाठी जहाजाच्या तळाशी असलेले छिद्र) आहे.
पाणबुडी बचाव कार्य (Submarine Rescue): संकटग्रस्त पाणबुड्यांमधील कर्मचाऱ्यांची सुटका करण्यासाठी डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेइकल (DSRV) तैनात करणारे हे प्रमुख जहाज आहे.
अद्ययावत उपकरणे: यामध्ये रिमोटी ऑपरेटेड व्हेइकल्स (ROVs), १५ टनांची सबसी क्रेन, डायनॅमिक पोझिशनिंग सिस्टीम आणि हायपरबेरिक चेंबर्ससह ८ खाटांचे रुग्णालय उपलब्ध आहे.
वर्ग आणि भूमिका :-
आयएनएस निपुण हे आयएनएस निस्तर या त्याच्या दुसऱ्या जहाजासोबत निस्तर-क्लास DSV चा भाग आहे. हे दोन्ही जहाजे भारतीय नौदलाला हिंद महासागर क्षेत्रात खोल समुद्रातील बचाव कार्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र क्षमता प्रदान करतात.




