The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

कलाशिक्षक संजय जगताप यांना शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित

नाशिक : के.बी.एच. विद्यालय, पवननगर, सिडको येथील कलाशिक्षक संजय मुरलीधर जगताप यांना शैक्षणिक, कलात्मक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सार्वजनिक वाचनालय, नाशिक गौरव समिती यांच्या वतीने शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संत तुकाराम महाराजांचे वंशज व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या सर्वांगीण व संस्कारक्षम व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणे, शैक्षणिक गुणवत्तावृद्धीसाठी योगदान देणे तसेच सामाजिक बांधिलकी जपत विविध कलात्मक उपक्रम राबविणे, या कार्याची दखल घेत संजय जगताप यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
कला, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी या त्रिसूत्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी संजय जगताप सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या सन्मानाबद्दल संस्थेचे समन्वयक व पदाधिकारी, शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक, कला क्षेत्रातील सहकारी तसेच मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

– संजय जगताप
कलाशिक्षक