महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २५ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या नवीन शासन परिपत्रकानुसार, जात प्रमाणपत्र पडताळणी (Caste Validity) प्रक्रिया आता १००% ऑनलाइन करण्यात आली आहे. यापुढे ऑफलाइन पद्धतीने अर्ज किंवा प्रत्यक्ष कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.
नवीन कार्यपद्धतीतील प्रमुख बदल खालीलप्रमाणे आहेत:
- अर्जाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन: आता https://www.cvc.barti.in या बार्टी (BARTI) आणि टीसीएस (TCS) विकसित आधुनिक CCVIS प्रणालीवरूनच अर्ज करावा लागेल.
- कार्यालयात जाण्याची गरज नाही: सर्व मूळ कागदपत्रे, दस्तऐवजी पुरावे आणि प्रतिज्ञापत्रे (Affidavits) स्कॅन करून ऑनलाइन अपलोड करायची आहेत. त्यांची प्रिंट काढून समितीच्या कार्यालयात जमा करण्याची पद्धत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
- आधार-आधारित एकच अर्ज: अर्जदाराच्या आधार क्रमांकाशी प्रणाली जोडलेली असल्याने एका व्यक्तीला एकच अर्ज दाखल करता येईल. त्यामुळे माहिती भरताना अचूकता राखणे आवश्यक आहे.
- ऑनलाइन सुनावणी (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग): पडताळणीदरम्यान सुनावणीची आवश्यकता भासल्यास ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन घेतली जाईल. केवळ अपवादात्मक परिस्थितीत बार्टी महासंचालकांच्या परवानगीने प्रत्यक्ष सुनावणी होईल.
- निर्णयाचा कालावधी आणि डिजिटल प्रमाणपत्र: कागदपत्रे परिपूर्ण असल्यास समिती शक्यतो ६० दिवसांच्या आत निर्णय घेईल. डिजिटल स्वाक्षरी असलेले जात वैधता प्रमाणपत्र अर्जदाराला थेट ई-मेल आणि व्हॉट्सअॅपवर पाठवले जाईल.
- AI चॅटबॉट मार्गदर्शन: अर्ज भरताना येणाऱ्या शंकांचे निरसन करण्यासाठी पोर्टलवर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित (AI) चॅटबॉटची सुविधा दिली आहे.
सुधारित अर्ज शुल्क:
प्रयोजन (Purpose) शुल्क
शैक्षणिक प्रवेश व शिष्यवृत्ती ₹१००
ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ₹५००
शहरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ₹१,०००
शासकीय नोकरी (सेवाविषयक) ₹१,०००
इतर शासकीय योजना व सवलती ₹१,०००




