The Sapiens News

The Sapiens News

चेहडीत सात वर्षांच्या मुलावर बिबट्याचा हल्ला, वासराला केले फस्त

नाशिक:-  चेहडी गावात एका सात वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला असून त्याला जखमी केले आहे .  त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या मुलावर हल्ला करून नंतर बिबट्याने एका गाईच्या वासरास शिकार केले तसेच दोन अडीच तास या भागात तो डरकाळ्या फोडत होता.

या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाची नाव नवनाथ शिवाजी माळी (वय 7, रा. सातपुते मळा, मळई भाग, चेहडी) असे आहे. नवनाथ यास रात्री लघुशंका करायची असल्याने तो त्याच्या खोपी मधून बाहेर आला.

यावेळी अचानक बेसावध असलेल्या नवनाथ वर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला व त्याच्या उजव्या खांद्याला आपल्या तोंडात धरून जवळपास वीस पंचवीस फुटा पर्यंत ओढत नेले. मुलाने जोरजोरात आरडा ओरड केल्याने त्याच्या आई, वडील, बहीण व भाऊ यांनी त्याच्या दिशेने धाव घेतली.  एकच गोंधळ ऐकून बिबट्याने मुलास सोडले आणि तो अंधारात लपून राहिला.

काही वेळाने बिबट्याने जवळच असलेल्या गोठ्यात बांधलेल्या एका वासराला आपली शिकार केली. व निघून न जाता जवळपास दोन अडीच तास माळी यांच्या खोपीच्या आसपास डरकाळ्या देत होता. दारणा नदी किनार असल्याने व साधन नसल्याने जखमी मुलावर रात्रभर घरगुती उपचार करून सकाळी बिटको हॉस्पिटल मध्ये दाखल केले.

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
Coming Soon
Do You Like Our Website?
UPSE Coaching

Recent Posts