शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नाशिकमध्ये दादासाहेब गायकवाड सभागृहात कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ व युवा नेते श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांचे हे वक्तव्य येताच उपस्थित कार्यकत्यात एकच जल्लोष झाला व मोठ्या घोषणाबाजी ही देण्यात आल्या.
नाशिक लोकसभा मतदार संघातून हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आणायचे आहे असे वक्तव्य त्यांनी केले.
त्यांच्या या वक्तव्याने अनेक अफवाना सध्यातरी पूर्ण विराम मिळाला आहे नुकताच नाशिकच्या एका संतांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती व त्यांना नाशिक मतदार संघात उमेदवारी मिळते का काय अशी शंका होती परंतु श्रीकांत शिंदेंच्या स्पष्ट वक्तव्याने सर्व अफवा हवेत विरल्या असून शिंदे गटाकडून गोडसे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल याची शास्वती आत्ता निश्चित झाली आहे
