पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे आगमन झाले. कन्याकुमारी येथील भगवती अम्मन मंदिरातही त्यांनी प्रार्थना केली.
कन्याकुमारी येथे तीन दिवसांच्या ध्यान धरणेवर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी संध्याकाळी तामिळनाडूतील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे आगमन झाले. पीएम मोदींनी 30 मे रोजी ध्यान मंडपम येथे ध्यान सुरू केले. 1 जून रोजी त्याची सांगता होणार आहे.
स्वामी विवेकानंदांनी 1892 मध्ये भारताच्या भविष्याची स्पष्ट दृष्टी मिळविण्यासाठी ध्यानमंडपम येथे ध्यानधारणा केली होती.त्याच ध्यानमंडपम मध्ये पंतप्रधान मोदी ध्यान करत आहेत.
हे हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राचे मिलन बिंदू आहे आणि कन्याकुमारीची निवड राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देते असे भाजप नेत्यांनी सांगितले.