नुकताच लागलेल्या पदवीधर व शिक्षक निवडणुकीत अनिल परब हे उबाठाचे उमेदवार म्हणून निवडून आले. ज्यांना उद्धव ठाकरे यांचे सेनापती मानले जाते. त्यांच्या निवडीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेचकट टीका वजा भाष्य केले आहे.
“अनिल परब हे पुन्हा एकदा निवडून आल्यामुळे निरोपाऐवजी त्याचं स्वागत करतो. आता ते पदवीधर मतदारसंघामधून आमदार झाले आहेत. अर्थात तुम्ही पदवीधर मतदारसंघामधून विधानपरिषदेत आला असलात तरी फक्त पदवीधरांचे प्रश्न मांडणार नाहीत, तर राज्यातील सर्वच पश्न तुम्ही सभागृहात मांडताल, याची कल्पना आम्हाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सेनापती म्हणून अनिल परब यांच्याकडे पाहिलं जातं”,