विशाल तळवडकर, वरिष्ठ विपणन व्यवस्थापक याला एक लाख रुपयाची लाच स्वीकारतांन नाशिकमध्ये काल अटक करण्यात आली. त्याच बरोबर त्याच्या निवासस्थान आणि कार्यालय परिसरात झडती घेण्यात येत आहे. तळवडकर याला आज नाशिकच्या सीबीआयच्या विशेष न्यायाधीशांसमोर हजर करण्यात येणार आहे.
ही कारवाई त्याच्या विरुद्ध एका कंपनीने AG MARK अर्ज केला होता तो त्या संदर्भातील प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात तळवडकर याने लाच मागितली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सीबीआयने सापळा रचला ज्यात तो जाळ्यात अडकला. सीबीआयने विशाल तळवडकर आणि AG-MARK, नाशिकच्या इतर अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
डॉ सदानंद दाते, आयपीएस, डीआयजी सीबीआय एसीबी मुंबई यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.