दि. 21 जानेवारी रोजी संगमनेर येथे महावितरणचे कार्यकारी अभियंता थोरात यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शिवसेनेचे संपर्क प्रमुख व सामजिक कार्यकते प्रवीण आप्पासाहेब
शिंदे (रवंद, कोपरगाव) यांनी व त्यांच्या सहकारी यांनी मळेगावथडी गावात अनियमित होणाऱ्या वीजपुरवठया बाबत माहिती दिली आणि रवंदे सबस्टेशनमध्ये पाच एम व्हीचे नवीन ट्रान्सफॉर्मर त्वरित बसविण्याची निवेदनाद्वारे मागणी केली. तसेच येत्या आठ दिवसात नवीन ट्रान्सफॉर्मर न बसविल्यास दि.२७-०१-२०२५ पासुन रवंदे येथील सबस्टेशनमध्ये बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा ही दिला आहे.
प्रतिनिधी कोपरगाव : दि. सेपियन्स न्युज