ठिकाण त्रं… पो.स्टे. रात्रीची हजेरी सुरू होती. साहेबासह सर्व स्टाफ शिस्तीत उभा होता कारण विभागात शिस्त खूप महत्त्वाची मानली जाते (अर्थात केवळ कागदावर) त्यात एक पोलीस तरुणी पुढे आली आणि तिने एक वृद्ध कर्मच्याऱ्याच्या गालावर 2,3 चापटी लगावल्या आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एकच गोंधळ उडाला. त्यावर ती थांबली नाही तिने साहेबांना तिची लेखी तक्रार घेण्यास सांगितले साहेब ही हादरले. तक्रार होती, त्या वृद्ध पोलिसांचे नी तिचे अनैतिक संबंध असल्याचे होते ज्यासाठी त्याने तिला प्रलोभन देऊन वेळोवेळी….. तिचे आरोप ऐकून कुणालाही फार आश्चर्य वाटले नाही कारण तिचे नी त्याचे तसले संबंध हे ओपन सिक्रेट होते. आणि त्यात या वृद्ध पोलिसाची जास्त चूक होती कारण पुढे आग आहे हे माहीत असून ही तो अनेक दिवसापासून खेळ करीत होता. अर्थात सांगायला नको की त्याच्या अंगातील माज हा लाचखोरीच्या पैशातून आलेला होता शेवटी तसला पैसा आणि काय आणेल. त्याला सुरवातीला म.. आली आणि सर्व देऊन घेऊन असल्याने तो गाफील होता त्यालाच काय कुणाला ही वाटले नव्हते ती असं काही करीन पण तिने याची वाट लावली. या मूर्खाला हेच कळले नाही की ज्याला तो मधमाशीच पोळ समजतो आहे ते आग्यामोळ आहे. आता प्रश्न पुढे काय झाले. अर्थात तोडीपाणी तब्बल 4.5 लाखात. त्यात सन्मानीय साहेबांही आनंद मिळाला. त्या रात्री पोलीस ठाण्यात वैचारिक तीन गट होते. 1 स्टाफ शोकिंग 2 ती व साहेब आनंदी 3 वृद्ध पोलीस खूप दुःखी नी कष्टी कारण त्याच सगळंच गेलं होतं लाज पैसा आणि साहेबानी दिलेली क्रीम पोस्ट.
अशाच सत्य,सुरस,रंजक गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या संकेतस्थळास नियमित भेट द्या.