संपादकीय
एक अतिशय सुखद अनुभव जो नाशिक शहर पोलिसांकडून मिळाल्याचे येथे नमूद करतो. साधारण 9 महिन्यांपूर्वी माझा मोबाईल हरवला अनेक कॉल केले परंतु ज्याला सापडला त्याने स्विच ऑफ केला अर्थात त्याला तो द्यायचा नव्हता. मी तात्काळ अंबड पोलीस स्टेशनला त्या संदर्भात कंप्लेंट दिली त्यावेळी तेथील स्थापने देखील खूप छान सहकार्य केले. आणि सेंट्रल गव्हर्मेंटच्या पोर्टलवर देखील मिसिंग कंप्लेंट केली काल मला त्या संदर्भात मेसेज आला की तुमचा नंबर ट्रेस झालेला आहे त्या संदर्भात अंबड पोलीस स्टेशनला कळवले आहे तरी पोलिसांशी संपर्क साधावा मी तात्काळ अंबड पोलीस स्टेशनला हे काम पाहणारे किरण भोर यांना संपर्क साधला आपल्याला आश्चर्य वाटेल त्यांनी याविषयी तात्काळ दखल घेऊन एवढ्या व्यस्त कामात देखील संबंधित व्यक्तीचा पत्ता त्याचे मोबाईल नंबर याची माहिती काढली आणि सुखद धक्का हा की आज माझा मोबाईल रिकव्हर करण्यात आला अनेकदा सर्वसामान्यांना वाटतं की पोलीस काहीच करत नाही परंतु मी अभिमानाने सांगतो पोलीस खरोखर त्यांच्या क्षमता पेक्षाही खूप जास्त काम करतात. नक्कीच त्यातही वाईट लोक असतातच ज्यांना आम्ही वेळोवेळी पॉईंट आऊट करतो. एक पत्रकार म्हणून ते आमचे कर्तव्य देखील आहे परंतु आमचे हे देखील कर्तव्य आहे की जेथे असे सुंदर अनुभव येतात त्याच्या संदर्भाने पोलीस विभागाला धन्यवाद देखील द्यावे. जे या लेखाद्वारे देण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे.मोबाईल रिकव्हर करणे कामी ज्या पोलीस विभागातल्या व्यक्तींनी मला मदत केली त्यांच्या नावाचा देखील येथे उल्लेख करणे क्रमप्राप्त होतं त्यात अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रजपूत साहेब किरण भोर बाळासाहेब भोर व राहुल झगझाप सायबर क्राईमचे विनोद वेताळ आणि एक कर्मचारी ज्यांचं नाव माहित नसल्याने ते राहून जात आहे त्यासाठी त्यांचे क्षमस्व. परंतु पुनश्च नाशिक शहर पोलीस तसेच अंबड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक व त्यांच्या तत्पर व कार्यक्षम स्टाफचे खूप खूप धन्यवाद……
शिरीष प्रभाकर चव्हाण
संपादक : The Sapiens News
तथा माहिती हक्क अधिकार कार्यकर्ता



