जगाची अंतिम करन्सी कोणती आहे ? काही म्हणतील डॉलर काही म्हणतील yen काही म्हणतील रियाल परंतु जगाची अंतिम करन्सी आहे सोने कारण अमेरिकेत डॉलर चालतो भारतात रुपया. न रुपया अमेरिकेत चालतो न डॉलर भारतात परंतु सोने दोन्हीकडे चालते एखाद्या अमेरिकन कडे सोने असेल तर तो भारतात विकू शकतो आणि भारतात तील सोने अमेरिकेत अगदी त्याला कन्व्हर्ट न करता परंतु डॉलरला भारतात कन्वर्ट करायला लागेल आणि रुपयाला अमेरिकेत. म्हणून जगाची मूलभूत करन्सी आहे सोने. जिला स्त्री पुरुष भाषांचं ऋतूंचं बंधन नाही. युद्ध झाल्यास देश सोडल्यास जगाच्या पाठीवर कुठेही गेल्यास तुम्हाला सोने देऊन अन्न पाणी मिळू शकते आणि काहीही. जेव्हा कुण्या देशाची करन्सी डुबायला लागते तेव्हा तो सोन्याच व्यवहार करतो. अगदी भाषा कळो न कळो कारण सोनं वजनावर असतं आणि पैशाचं वजन नसतं ते कधीही कागद होऊ शकते तसेच सोन्याला कोणताही देश रेग्युलेट करू शकत नाही त्याच्यावर बंदी घालू शकत नाही जशी नोटबंदी होते. सोन्याची किंमत सीमेत बदलते. परंतु नोटबंदी सारखी संपुष्टात येत नाही. विशेष नोटा तयार होता सोनं तयार करता येत नाही. सोन्याची खरी गरज आणि महत्व जेवढं शांततेच्या किंवा आनंदाच्या काळात असतं त्यापेक्षा कितीतरी अधिक अडचणीत असतं. मग प्रश्न हा आहे की पुढेही सोन्याच्या किमती वाढतील का? माझं मत आहे नुसत्या वाढणार नाही मजबूत वाढेल जेवढे जगाच्या पाठीवर युद्ध होतील तेवढे सोने आणखी वर चढेल. दुसरा प्रश्न सोन घ्यायला पाहिजे का सोन्यातली इन्व्हेस्टमेंट कशी डेफिनेटली उत्तर आहे सोन्याची इन्व्हेस्टमेंट शाश्वत आहे आणि ते घेतलं पाहिजे यासाठी नाही की सोनं चमकत यासाठी की मानव युद्धखोर आहे आणि जेवढे युद्ध होतील तेवढे सोने कामी येईल आणि वाढेल देखील.
शिरीष प्रभाकर चव्हाण संपादक : दि सेपियन्स न्यूज तथा
माहिती हक्क अधिकार कार्यकर्ता



