The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

संपादकीय : GPF शासकीय सेवकांचे आर्थिक अज्ञान….

अनेक  शासकीय सेवक संपन्नतेच्या दृष्टीने एक मोठी चुक करतात आणि ती म्हणजे आर्थिक गोष्टींच्या वाढीचे व्याजदर समजून घेत नाही. आपले कष्टाचे व सर्वाधिक पैसे नेहमी अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करतात जेथे सर्वात कमी व्याजदर असतो आणि त्याला टॅग लावतात सिक्युरिटी. (विशेष म्हणजे हे तेच काही सरकारी कर्मचारी असतात जे पाचशे हजारसाठी आपली नोकरी धोक्यात घालतात तेथे त्यांना सिक्युरिटी वगैरे दिसत नाही फक्त आणि फक्त लोभ  लाचखोरी दिसते.) त्यातील त्यांचं सर्वात आवडत टूल असत GPF जे सर्वात कमी व्याज देते. अगदी 6 ते 8 % च्या दरम्यान. त्यांचे गोल्ड सिल्वर विविध बॉण्ड्स म्युचल फंड रियल इस्टेट स्टॉक मार्केट याकडे लक्ष नसते. कारण दोन. 1 वेळच मिळत नाही स्वतःच्या उन्नतीकडे लक्ष द्यायला. 2 इच्छाशक्तीच नसते. परंतु त्यांना हेच लक्षात येत नाही की वर दिलेले सर्व टूल नीट लक्ष दिले तर सेफही आहेत आणि यात ग्रोथ ही आहेत. अगदी त्यांच्या GPF पेक्षा ही कितीतरी अधिक. विशेष म्हणजे यांना आपल्या GPF वर खूप अभिमान, सांगत फिरतात माझा GPF 20K 25K पण तोच GPF महागाईदाराला देखील बीट करीत नाही आणि आयुष्य ट्रेडमिलवर पळल्या गत होत. समृद्धीसाठी शासकीय सेवकांनी दोन कामे नक्की करावी 1 GPF कमीतकमी ठेवावा, 2 वेळोवेळी काढून तो वरील tools मध्ये invest करावा. सर्वात मोठी घोडचूक ही मंडळीची करतात की लग्न व स्वतः राहण्यासाठी मोठ घर बांधण्यासाठी फंड काढतात जी डेड इन्व्हेस्टमेंट असते. ते तेव्हाच करण्याची पाळी येते जेव्हा मजबूत वाढीच्या tools मध्ये investment केलेली नसते. सारांश : जर शाश्वत उन्नती हवी असेल तर कोणत्याही गुंतवणुकीचा व्याजदर महाईदार व CAGR तपासावा. पण 90% लोकांना स्वतःच्या गुंतवणुकीचा जिथे व्याजदर माहिती नसतो तेथे महागाई दर आणि CAGR काय माहिती असेल ? माफ करा ही वस्तुस्थिती आहे शासकीय सेवकांची आणि एक करप्ट आणि भ्रष्ट लोकांपेक्षा सुनियोजित आणि समजून-उमजून गुंतवणूक करणारा कुणीही अधिक संपन्न असतो.

संपादक : शिरीष प्रभाकर चव्हाण

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts