Che gavera आपल्याला नक्कीच माहिती असेल ज्याने क्युबा कडन लढून अमेरिकेला नाकी नऊ आणलं होतं. इतिहासात अमेरिकेचे जेवढे या व्यक्तींनी नुकसान आणि नाचकी केली ती केवळ आणि केवळ व्हिएतनामनी केलेली. अतिशय उच्च दर्जाचा योद्धा, विशेषता गनिमी काव्यात जो फिडल्ट कॅस्ट्रोचा सुद्धा सर्वात जवळचा सेनापती होता. जेव्हा अमेरिकेने त्याला एका मेंढपाळाने गद्दारी केली म्हणून पकडले. त्यावेळी अमेरिकन कॅप्टनने त्या मेंढपाळाला विचारले हा तुमचा महान लढवय्या नेता. आयुष्यभर तुमच्यासाठी लढला आमच्यापासून तुम्हाला वाचवण्यासाठी. तरी देखील तू याच्याशी गद्दारी का केली व याला पकडून का दिले तर मेंढपाळ जे वाक्य बोलला ते ऐकून अमेरिकेच्या कॅप्टनला सुद्धा डोक्याला हात लावावेसे वाटले आणि ते वाक्य होते “यांच्या युद्धखोरीमुळे आणि बंदुकीच्या आवाजामुळे माझे मेंढरं डचकतात.
सारांश : मूर्ख बुद्धीच्या आणि जीवनात कुठलेही मोठे लक्षण व उद्देश नसलेल्या छोट्या बुद्धीच्या लोकांसाठी कधीही लढू नका ते अतिशय शुल्लक कारणा व स्वार्थासाठी त्यांच्यासाठी महान कार्य करणाऱ्या देखील विकू शकतात. कधीही भित्र्या घाबरट आणि कच खाऊ लोकांसाठी लढू नका जगातले सर्वात मूर्ख तुम्ही ठराल.
शिरीष प्रभाकर चव्हाण
संपादक : The Sapiens News तथा RTI कार्यकर्ता




