इच्छित बदलीसाठी बैठक होते, बैठकीत बाटली येते, बाटली घेतली की बाई आठवते. बाई बाबाची नाजूक नस तिच्या मार्फतच बदली होते. अर्थात हे बदलीसाठी आणि बदलीमुळे होते. दोष मात्र बैठक, बाई, बाबा आणि बाटलीला दिला जातो.
टीप : प्रत्येक क्षेत्रात अपवाद असतात म्हणूनच त्यांचा सन्मान….
बदली : राजकारण आणि नोकरशांमध्ये सर्वाधिक जिव्हाळ्याचा आणि संवेदनशील असलेला शब्द म्हणजे बदली. कारण चांगल्या बदलीत मोठा मलिदा मिळतो आणि मोठा मलिदा हा सात पिढ्यांसाठी कमावला जातो. नीती अनिती याचा कोणताही विचार न करता. हाच मलिदा आणि हीच बदली एक सत्ता केंद्र तयार करते समाजात मोठा मानसन्मान देते म्हणून बदली ही सर्व विकृतींचे मूळ आहे.
बैठक : योग्य ठिकाणी बदली करून घेण्यासाठी बैठकीची आवश्यकता असते. अशी बैठक जी अनेकदा गुप्त ठिकाणी होते आणि प्रभावी बदली करून देणाऱ्या व्यक्तीं समवेत. ज्यात संबंधित व्यक्तीला खुश करण्यासाठी बरंच काही दिलं जातं कारण तो मलिदयाच्या ठिकाणी बदली देणार असतो.
बाटली : बैठकीत समोरच्याच मन जिंकण्या करिता बाटली आवश्यक असते. रंगीबेरंगी बाटली ही माणसाला रंगीला करते. त्याच्या मनात विविध गोड आंबट भावनांची निर्मिती करण्याकरिता बाटली सर्वात प्रभावशाली असते. सर्वात महत्त्वाचे बाटली पोटात गेल्याने डोके ठिकाणावर ठेवीत नाही आणि ठिकाणवर नसलेले डोके हे निती अनितीचा विचार देखील करू शकत नाही. बाटली खूप काही करत नाही फक्त बुद्धी भ्रष्ट करते आणि एकदा का बुद्धी भ्रष्ट झाली नीती अनितीतला फरक धूसरं झाला की तो ते सर्व करतो जे मानवातील राक्षसच करू शकतो.
बाई : एकदा रंगीबेरंगी बाटली पोटात गेली की मनुष्य रंगीला होतो आणि रंगीला मनुष्य सर्वप्रथम एकाच गोष्टीचा विचार करतो आणि ती गोष्ट आहे बाई. बाबालाही नैतिकदृष्ट्या भ्रष्ट करेल अशी जगातील सर्वात पावरफुल गोष्ट जिच्या आहारी मोठमोठे ऋषीमुनी, देवही गेले व आपले शील गटार करून घेतले. अगदी कुणालाही झुकवेल अशी शक्ती. तिच्या मर्जीने अथवा अमर्जीने देखील सत्ता केंद्र प्राप्तीसाठी किंवा त्याच्या जवळ जाण्यासाठी सर्वाधिक वापरली जाणारी गोष्ट म्हणजे बाई.
बाबा : सामाजिक स्तरावर आजही कोठेतरी सन्मानप्राप्त नाव ज्याचा उपयोग अनितीची संपत्ती, अनैतिक सबंध, अमर्याद सत्ता केंद्र स्थापित करायला पचवायला उपयोग होतो आणि महत्त्वाचे हे की यांची मानगुट पकडण्याची कोणाची हिम्मत होत नाही 99% लोक यांचे पाय आणि पादुका याच्यावरती पाहतच नाही आणि बाबा देखील नेहमी स्पर्शाला महत्त्व देतो अगदी विशेष त्या स्पर्शाला जो स्पर्श बाईचा असतो. सुरुवातीला या संबंधात गुरु शिष्य सात्विक भाव आध्यात्मिक समर्पण असते. जे पुढे जाऊन ऐहिक आणि देहिक सुखाकडे परावर्तित होते. अनेकदा दोन्ही बाजूनी काही वेळेला एका बाजूने. बहुतांश बाबांना बाई जेवढ्या झटपट प्रसन्न करू शकते तेवढ्या झटपट ना कुठला पुरुष करू शकतो ना कुठली संपत्ती. बाबाचा आशीर्वाद मिळवण्याकरिता बाई हे माध्यम सर्वाधिक प्रभावी असते.
“प्रत्येक गलिच्छ व्यक्ती याच तंत्रातून , प्रक्रियेतून आणि कुटील कारस्थानातून जातो…. मग तो शासकीय सेवक असो, कुठला राजकीय नेता किंवा उद्योगपती”
संपादक : शिरीष प्रभाकर चव्हाण दि. सेपिअन्स न्यूज
तथा RTI कार्यकर्ता




