The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

सर्वात प्रभावशाली तीन पेशे- आध्यात्मिक गुरू, वकील, मीडिया हाऊस मालक

कुणालाही विचारलं तर सर्वात प्रभावशाली पेशे कुठले आहे तर उत्तर असेल पोलिस नी राजकारणी परंतु ते उत्तर खोटं असेन. कारण पोलीस नेहमी दबावात काम करता आणि नेत्याला दर पाच वर्षांनी अथवा एक-दोन वर्षातच नको नको त्या लोकांच्या पुढे हात जोडावे लागतात मनातले आणि परखड बोलता देखील येत नाही. माझ्या मते आध्यात्मिक बाबा, वकील व न्यूज मीडिया हाऊसचा मालक हे टॉप आणि पावरफूल पेशे आहेत. मीडिया हाऊस मालक, येथे मी पत्रकार बोलत नाही आहे कारण की पत्रकाराची लेखणी ही नियंत्रित करण्याचे काम हे न्यूज मीडिया हाऊसचे मालक लोक करतात. 1 अध्यात्मिक गुरु, या गुरूंपुढे सर्व नतमस्तक होतात अगदी चांगल्या अर्थाने जरी म्हटले तरी यात करिअर करण्यासारखे खूप काही छान आहे आणि वाईट अर्थाने जरी म्हटले तरी यांच्या चरणी सर्व नेते मंडळी नोकरशहा, उद्योगपती असतात. आपले काळ्याचे पांढरे करायला. 2 वकील हा असा पेशा आहे की तो दाऊदला भेटला काय आणि राष्ट्रपतीला ही भेटला काय तरी त्याला कुणालाही उत्तर द्यायची आवश्यकता नसते. कायद्याचे ज्ञान असल्याने तो कोणतीही केस कशाही पद्धतीने फिरवू शकतो तारीख पे तारीख 3 आणि सरते शेवटी न्यूज हाऊसचा मालक, ज्याच्याकडे समाजाने किंवा तुम्ही आम्ही काय वाचावे याचं पूर्णपणे नियंत्रण असतं. सरस्वतीचे पूजक तो स्वतःकडे नतमस्तक करून ठेवतो. त्याच्या न्यूज पेपरमध्ये आलेली एक न्यूज कुणाचं एवढं मोठं नुकसान करू शकते की ते भरून काढायला त्याला दहा पंधरा वर्षे जातात फक्त एका ओळीत आणि लिहिणारे त्याच्या पायाशी आपली लेखणी ठेवतात. विशेष म्हणजे यांना बातमी लावण्यासाठी ही आणि न लावण्यासाठी देखील विनवणी होते तीही मोठमोठ्या नेते, नोकरशहा, उद्योगपती आणि अगदी बाबा लोकांकडूनही. आता तुम्हीच विचार करा यातन तुमच्या मुलांना काय केले पाहिजे.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts