The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

मोदीजी आपल्या आवाहनाचे स्वागतच आहे परंतु नेते आणि  नोकरशहांच्या वर्तनाचे काय ?

पंतप्रधान मोदींनी काल जनतेस काही आवाहन केले. ज्यात प्रामुख्याने पुढील काही बाबी आहेत ज्या अधिक प्रभावी अंमलात येण्यासाठी आम्ही देखील काही सूचना सुचवीत आहोत.


1 सोन वर्षभर खरेदी करू नये.
नक्कीच सामान्य लोकांकडून त्याची अंमलबजावणी होईल. पण ते स्वस्त झाल्यावर नेते व नोकरशहा ते खरेदी करणार नाही याची ग्वाही कोण घेईल.

2 पेट्रोल डिझेल कमीत कमी वापरावे व सार्वजनिक वाहनांचा वापर करावा.
हेही मान्य पण आपलेच नेते ऑडी रेंज रोवर फॉर्च्यूनर मध्ये फिरता आहेत त्यांना म्हणावं अगदीच पब्लिक ट्रान्सपोर्टेशन जरी आपणास वापरायची जीवावर येत असेल तरी EV कार तर आपण घेऊच शकता ना ऍटलिस्ट त्या तरी घ्या. आणि नेत्यांच्या नोकरीच्या मुलांना दिलेल्या आलिशान कार साधारण वर्षभर न चालवण्याचे त्यांच्यावर बंधन करा. तसेच नोकरशांना आणि नेत्यांना देखील सांगा जर त्यांच्या गाड्या वापरायचे असतील तर पाच पाच नेते एका गाडीत संसदेत या.

3 परदेश प्रवास
काय थट्टा करता मोदीजी येथे गॅस सिलेंडर 99% लोकांना घेणे देते परवडत नाही तेथे परदेश प्रवास सामान्य मध्यमवर्गीय आणि गरीब लोक असे करू शकते कदाचित हे आव्हान आपण लवकर शहा आणि नेत्यांच्या मुलांना आणि त्यांच्या फॅमिलीला काढायला हवे किंवा केले असावे.

4 स्वदेशीचा अवलंब
उंची ब्रांडेड आणि परदेशी जीवनशैली ही खरोखरच आम्हाला परवडण्याजोगी नाही त्यामुळे जे काही आम्ही वापरू आणि वापरतो आहे की लोकलच आहे हा परंतु आपल्याच अवतीभवती असलेल्या लोकांना देखील त्यांचा ब्रँड सोडायला लावणं ही आपल्यासाठी आव्हानात्मक गोष्ट आहे हे देखील आम्ही जाणतो देशाच्या पंतप्रधानाची गाडी किंवा विरोधी पक्ष नेत्याची देखील गाडी जर विदेशी असेल तर  स्वावलंबन कसे येईल. आहेत आपल्याकडे महिंद्रा आणि टाटा च्या गाड्या देखील मजबूत आणि आलिशान त्याचबरोबर कमी किमती देखील.


तरीदेखील आम्ही भारताचे सामान्य गरीब मध्यमवर्गीय नागरिक आपण केलेल्या आव्हानाला नक्कीच सकारात्मक प्रतिसाद देऊ आणि देशाच्या प्रगतीसाठी अडचणीत देशाला काम येण्यासाठी पूर्वीप्रमाणेच स्वतःला झोकून देऊ आणि आमच्या  आशा आकांक्षा आणि स्वप्नांना तिलांजली देखील देऊ. हे आम्ही आपणास वचन देतो. फक्त तेवढं भ्रष्टाचार लाचखोरी देशाशी गद्दारी करणाऱ्या लोकांचे काय ते पहा. नाहीतर वरील गोष्टींसाठी कायदाच करा ना म्हणजे जनतेला देखील कळेल कोण आपल्या आव्हानांना प्रतिसाद देत नाही आहे.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts