The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

China strategy : it’s all about power game

जगात चीन एवढा कट्टर खुनशी आणि वेळेची वाट पाहून वचपा काढणारा देश दुसरा कोणता नसावा. आत्ताच चीनच्या दौऱ्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष गेले आहे ज्यांना चीनचे राष्ट्राध्यक्ष जीन पिन एका विशेष ठिकाणी भेटले आणि ती जागा आहे. चीनमध्ये अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या temple of heaven ची. मग नेमकी हीच जागा निवडण्याचे प्रयोजन तरी काय ? तर हे टेम्पल चीनच्या विंग वंशाने पंधराव्या शतकात हे टेम्पल बांधलेले जो वंश चीनमध्ये अतिशय बराटे होता. या वंशाचे राजे हे प्रजेच्या कल्याणासाठी आणि सामर्थ्यासाठी येथे येऊन पूजा करी आता ट्रम्पला तेथे घेऊन जाण्याचे प्रयोजन काय तर ट्रम्प यांनी मागील एक स्टेटमेंट दिलेले की भारत आणि चीन हे उघड्या नागड्या लोकांचे देश आहेत. चीनने हे बरोबर लक्षात ठेवलं आणि ट्रम्पला दाखवून दिलं की तुमच्या देशाला इतिहास जेवढा मोठा नाही तेवढा आमच्या देशाला आहे आणि तो तुमच्यापेक्षा कितीतरी अधिक संपन्न व सामर्थ्यशाली देखील आहे. आणि तेही कृतीतून दाखवून दिलं हे महत्त्वाचं आणि आपले नेते मोठमोठ्या राष्ट्राध्यक्षांना साबरमती आश्रमात घेऊन जातात. कुरुक्षेत्र, रायगड, मेवाड, चित्तोड, आयोध्या, नालंदा आणि मगध येथे नाही. जेथे आपल्या भारतवर्षाचे सामर्थ्य दडले आहे. विरोधक असला तरी शिकव नाही का त्याच्याकडन ही काही शहाणपणाचं ? देश कसा बनवायचा हे चीन कडन शिकावं. आणि त्याची अस्मिता. कशी दाखवायची हे देखील.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts