येथे ही बाब प्रामुख्याने नमूद करणे आवश्यक आहे की सध्याचे प्रशिक्षण केंद्रप्रमुख प्राचार्य यांनी गेल्या महिन्यातच संबंधित प्रमुख पदाचा पदभार स्वीकारला आहे.
PTS धुळे येथे 1.55 कोटीचा अपहार, घोटाळा दोन लिपिक आणि दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी केला आणि शासकीय यंत्रणेची लक्तर वेशीवर टांगली गेली त्याच संदर्भाने येथे 11 प्रश्न उपस्थित होतात. त्याची उत्तरे संबंधित प्रमुखांनी द्यावी ही सामाजिक अपेक्षा.
1 तब्बल 17 महिने हे लोक सरकारी तिजोरीवर डल्ला मारीत होती तरी देखील हे कुणाच्या लक्षात कसे आले नाही ?
2 एक सामान्य क्लास थ्री कर्मचाऱ्यांचा गट एवढं मोठं कांड कसं करू शकतो ?
3 या चौकडीच्या पाठीमागे कुण्या वरिष्ठाचा हात आहे का असल्यास तो कोण आणि त्याचे हात देखील यात ओले झाले आहे का ?
4 विविध स्तराच्या शासकीय किचकट आणि अध्यायावत यांत्रिकी यंत्रणेत असे अपहार देखील होऊ शकते याचा अर्थ संबंधित प्रणाली अथवा यंत्रणा कमकुवत नाही का ?
5 संबंधित यंत्रणेत कोठे कोठे कच्चे दुवे आहे हे शोधून काढण्याचे उत्तरदायित्व नक्की कुणाचे ?
6 या चौकडीने आलेल्या पैशाचे नक्की काय केले त्यांनी कोणत्या स्थावर आणि जंगम मालमत्ता घेतल्या ?
7 असे आणि प्रकार संबंधित प्रशिक्षण केंद्रात किंवा शासकीय विविध विभागात प्रतिबंधित करण्याकरिता स्थानिक पातळीवर वरिष्ठ अधिकारी काय उपाययोजना राबवतील ?
8 यातील जगदीश सोनवणे हा आरोपी नासिक ग्रा. पोलिस येथे नेमणुकीस असताना याच्या संदर्भात अनेक गंभीर तक्रारी वरिष्ठांना प्राप्त होऊन देखील त्यावर का ठोस कारवाई करण्यात आली नाही ?
9 अनेक आस्थापनांवर नोकरी करूनही आणि अनेक अपप्रकार करून देखील आज वर हा सोनवणे नावाचा लिपिक कोणाच्या आशीर्वादाने फोफावला ?
10 असे किती सोनवणे, बुवा, खोंड, गोसावी आजही असले गलिच्छ व गैरव्यवहार करीत आहेत ?
11 जी बाब लेखाअधिकारी भोई यांच्या लक्षात आली की त्यापूर्वी 17 महिन्यात इतर लेखा अधिकारी तसेच प्रशिक्षण केंद्रप्रमुख व कार्यालयीन अधीक्षक तसेच लेखापाल यांच्या लक्षात कशी आली नाही ?
संपादक : शिरीष प्रभाकर चव्हाण : The Sapiens News



