भारतातील कोणत्याही मुलाला निसर्गाच चित्र काढायला सांगा 99% एक सारखाच चित्र काढतील. चार-पाच आडव्या उभ्या रेषांचे डोंगर गोल सूर्य एक झोपडी आणि दोन कर्व रेषा ज्या पक्षी म्हणून असतील सूर्याला भगवा रंग डोंगरावर एखादं झाड असेल तर तिथे हिरवा रंग डोंगराचा रंग तांबडा आणि काढले तर त्याच्यावरती दोन-चार ढग काढतील त्याला पांढरा रंग दिला जाईल हे चित्र प्रत्येक लहान मुलाच्या डोक्यात फिक्स आहे. यापेक्षा वेगळं चित्र न मुलं काढता आणि एखाद्याने काढले तर शिक्षक वेगळ्या नजरेने पाहता. त्या सारख्या चित्रांमध्ये शिक्षक मार्क देतात आता मला सांगा मार्क तरी कशी देणार सगळ्यांचे एकसारखी ना त्याच्यात काही क्रिएटिव्हिटी ना इमॅजिनेशन ना डिफरन्स आपल्याला वाटेल हे तिन्ही शब्द केवळ शब्द आहे परंतु तसे नाही क्रिएटिव्हिटी इमॅजिनेशन डिफरन्स हेच माणसाला खऱ्या अर्थाने विकसित करतात आणि काही नाविन्यपूर्ण घडवण्यासाठी प्रेरित देखील. परंतु आपल्या देशात शिक्षण व्यवस्थेने हे तिन्ही शब्द किंवा गुण कम्प्लीटली लॉक केले आहे. वेगळा विचार करणे आपल्या देशात शाप आहे सृजनशीलता कल्पकता मारली जाते शिक्षकांचे प्रश्न मुलांना कळत नाही आणि मुलांची उत्तर शिक्षकांना. वर सांगितलेलं चित्र हे बौद्धिक गुलामगिरीचे प्रतीक आहे अशी गुलामगिरी जी सृजनशीलता कल्पकता नाविन्य आणि वेगळेपणा यांना प्रतिबंध करते किंवा संपुष्टात आणते. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या पलीकडेही काही असतं हे आपल्या शिक्षण व्यवस्थेला आणि पालकांना देखील मान्यच नाही. ना शिक्षण व्यवस्था ना पालक मुलांना काही वेगळ शिकवता आणि मुलांनी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला वाळीत टाकल्यासारखी वागणूक देतात कसा होईल विकास आणि कशे निघतील आपल्या देशातन चांगले उद्योजक, शास्त्रज्ञ, खेळाडू आणि कलाकार इथे तर पीएचडी देखील गाईडने दिलेल्या विषयावर होते तेथेही तीही चापलुसीने कुणाकडून याच्याकडनं उसना प्रबंध लिहून. आपण आपल्याला कॉपी-पेस्टच शिकविल्या जाते.





