सध्या प्रकरण खूप गाजत आहे Zee TV चे सुभाष चंद्रा यांचे बँकांनी कर्ज माफ केल्याचं ज्याची news The Sapiens News ने देखील केली. आता कळतं आहे की Zee ला उध्वस्त करण्या मागे मुकेश अंबानी यांचा हात आहे ज्याची ग्वाही स्वतः चंद्रा यांनीच दिली. त्याच बरोबर कॉर्पोरेट क्षेत्रात चाललेल्या दोन मोठ्या जायंटचे शीत युद्ध देखील समोर आले आणि ते जॉईंट दुसरे तिसरे कुणी नसून एक गुजराती आणि एक जैन मारवाडी आहे. अर्थात अदानी आणि अंबानी. हे सर्वांना माहीत आहे मुकेश अंबानी सर्वात महत्वकांक्षी माणूस आहे आणि तो कधीही कुणाला निदान भारतात तरी नंबर एक होऊ देत नाही. असे म्हणतात मागे आदानीच्या वाढलेल्या हिंडनबर्ग अडचणी ह्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या अंबानींनी प्लांट केल्या होत्या. त्यानंतर जेपी पावर या कंपनीच्या एक्वेजशियनच्या प्रोसेसमध्ये खोडा घालण्यासाठी अंबानींनी वेदांता ग्रुपला आदानींच्या पुढे केले होते आणि आत्ता सुभाष चंद्रा यांच्या झी न्यूजला हडप करण्याचा प्रयत्न मुकेश अंबानी करीत आहे. हडप यासाठी की कर्जबाजारी झालेला उद्योगपती स्वतःचा उद्योग हा स्वस्तात विकतो आणि अशा उद्योगांना स्वस्तात घेऊन त्यांचा सर्व सेटअप मिळवण्यासाठी मोठे जॉईंट प्रयत्नशील असतात. काही उद्योगपती तर स्वतःहून छोट्या उद्योगांना गोत्यात आणतात. अगदी त्यांचे बल्कमधे शेअर विकत घेऊन. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल जेव्हा आदानीच्या कंपन्या गोत्यात आल्या त्यावेळी सामान्य शेअर होल्डरने कमी भावात लॉसमध्ये विकले. परंतु त्या पडलेल्या भावात सर्वाधिक अदानींचे शेअर घेणारा व्यक्ती होता मुकेश अंबानी. असे म्हणतात अंबानींची एक मोठी यंत्रणा आहे उद्योगांना गोत्यात आणायचं आणि दीड दमडी विकत घ्यायचं. सध्या तरी त्याचा बळी पडतो आहे zee उद्योग समूह आणि जिच्या पाठीमागे आदानी उभे राहिले तर हे शीत युद्ध अवघ भारतीय उद्योग क्षेत्र व्यापेल. असो झी एन्टरटेनमेंटचे शेअर घेऊन ठेवा पुढे जाऊन हा समूह अदानी किंवा अंबानींचा होईल.





