नुकत्याच आलेल्या 12वी फेल या चित्रपटाने चर्चेत आलेल्या आयपीएस मनोज शर्माचे आता प्रमोशन करण्यात आले आहे. मनोज कुमार शर्मा यांना महाराष्ट्र पोलिसात उपमहानिरीक्षक (डीआयजी) वरून महानिरीक्षक (आयजी) पदावर बढती देण्यात आली आहे. त्याच्या कारकिर्दीतील ही महत्त्वाची कामगिरी मानली जात आहे.
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) 2003, 2004 आणि 2005 बॅचच्या IPS अधिकाऱ्यांच्या पदोन्नतींना मंजुरी दिली होती. नुकताच प्रदर्शित झालेला 12वी फेल हा चित्रपट आयपीएस मनोज शर्मा यांच्या जीवनावर आणि संघर्षावर आधारित आहे.
अत्यंत गरीब कुटुंबातून आलेले मनोज शर्मा बारावीत नापास होऊनही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन कसे आयपीएस अधिकारी बनले, हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रमोशन मिळाल्याची माहिती देखील शेअर केली आणि याबद्दल आपल्या हितचिंतकांचे आभार मानले.