सर्वात महागडे दूध कुठल्या प्राण्याचे हा जर प्रश्न कुणाला विचारला तर त्याचे उत्तर काय असेल अनेक लोक म्हणतील वाघाच हत्तीचं वगैरे परंतु त्याची किंमत आणि ते दूध उपलब्ध नाही. जे दूध उपलब्ध आहे त्यात प्रामुख्याने गाय म्हैस आणि जास्तीत जास्त बकरी किंवा मेंढीचे आहे ज्याची किंमत 50 ते 100 रुपये लिटर असू शकेल आणि अगदीच पुण्याच्या भाग्यलक्ष्मी डेअरीच दूध जरी आपण कन्सिडर केलं जे मोठे मोठे सेलिब्रेटीने आणि अंबानींच्या घरी जाते त्याची प्राईज देखील जास्तीत जास्त एक ते दीड हजार रुपये लिटर आहे. मग प्रश्न आहे की कुठल्या प्राण्यांच दूध सर्वात जास्त महाग आहे ? तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल गाढवाचं, हो गाढवाचच. आणि त्याचा लिटरचा भाव आहे पाच हजार ते सात हजार रुपये लिटर जो आपल्याकडे किंवा जगभरात उपलब्ध असलेल्या सर्व प्राण्यांच्या दुधापेक्षा कितीतरी अधिक पट जास्त आहे त्याचं कारण हे सांगितलं जातं की ते जास्तीत जास्त मानवी दुधाच्या सिमिलर किंवा साधर्म्य साधनाला आहे. विशेष हे की ते दूध सर्वत्र उपलब्ध नाही. आणि त्याची मिल्क पावडर जरी घ्यायला गेलं तरी एक लाख 35 हजार रुपये किलो आहे. परंतु एक गोष्ट येथे नमूद करणे नक्कीच आवडेल की 30, 35 वरील बहितांश व्यक्तींनी हे दूध जीवनात एकदातरी पिलेले असावे ऍटलिस्ट सामान्य शहरातील मुलांनी. म्हणून दोन गोष्टींसाठी गाढवाला नावे ठेवू नका एक त्यात आणि मानवी दुधात बऱ्यापैकी साम्य आहे कदाचित त्याच मुळे ते काही वेळ गाढवा सारखा वागतो दुसरी आहे की ते पृथ्वीवरील कोणत्याही प्राण्याच्या दुधापेक्षा अधिक महाग आहे आणि त्याही पुढे जाऊन कुणी व्यक्ती गाढवाप्रमाणे वागला तर आश्चर्य देखील मानू नका.





