(पेठ- नाशिक रोडवर कोटंबी घाटात अवैध दारुची वाहतुक करणारे इसमास २८,५५,४४० रुपयाचे मुददेमालासह घेतले ताब्यात विशेष पथकाची कारवाई)
आज दिनांक ११/१२/२०२५ रोजी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दमण दिव येथे तयार होणारी परंतु महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेली दमण निर्मीत विदेशी दारु आयशर क्रमांक एमएच-०४-एलई-६९७४ मध्ये भरुन पेठ मार्गे नाशिक बाजुकडे येत आहे तरी पुढील कारवाई करा बाबत कळविल्याने मा. पोलीस निरीक्षक श्री रविन्द्र मगर यांचे मार्गदर्शनाखाली पथक क्रं. ४ चे पोलीस उप निरीक्षक प्रकाश चव्हाणके, पोहवा /११०१ कैलास रामदास बागुल, पोकॉ/१६३६ किरण रामदास आहेर, पोकों/२६९२ श्रीराम दत्तात्रय वारुंगसे अशांना बातमी समजावून सांगुन आम्ही कारवाई कामी नाशिक येथुन पेठकडे खाजगी वाहनाने रेड कामी लागणारे साहित्य साधने घेवुन रवाना झालो. नाशिक पेठ मार्गे कोटंबी घाटाचे सुरुवातीस येवुन थांबलो तेथे पोलीस उप निरीक्षक प्रकाश चव्हाणके यांनी पंचनाम्यातील दोन पंचांना समक्ष घटनास्थळी बोलावुन घेवुन त्यांना देखील वरील सर्व बातमी समजावुन सांगितली व पेठ बाजुकडून येणारे वाहनांवर बारकाईने लक्ष ठेवून असतांनाच १४-०० वा. चे सुमारास पेठ बाजुकडून एक चॉकलेटी रंगाचा आयशर क्रमांक एमएच-०४-एलई-६९७४ त्यास वरतुन निळया रंगाची ताडपत्री बांधलेला नाशिक बाजुकडे भरधाव येत असतांना आम्ही त्यास इशारा देवुन रस्त्याचे बाजुस थांबवले व त्यास पोलीस व पंचाची ओळख देवुन आमच्या अंगझडत्या देवुन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने आपले नाव दिपक संजय काळे वय २५ धंदा मो. ड्रा. बोधेगाव ता. दारवा जि. यवतमाळ असे सांगितले त्यास गाडीत काय माल आहे बाबत विचारपुस करता तो उडवाउडवीची उत्तरे देवुन गाडी रिकामी आहे चेक करुन घ्या बाबत सांगीतले. त्याचे ताब्यातील आयशर क्रं. एमएच-०४-एलई-६९७४ ची पंचासमक्ष झडती घेता पाठीमागील ताडपत्री खोलून पाहता मागील बाजु पूर्णपणे रिकामी व पुढील बाजुस ड्रायव्हर बाजुला एक स्वतंत्र पत्र्याचा कप्पा दिसला सदरचे कप्याची पंचासमक्ष झडती घेतली असता सदरचे कप्यामध्ये खालील वर्णनाचा व किमतीचा प्रोव्ही. गुन्हयाचा मुददेमाल मिळून आला तो खालील प्रमाणे असे.
पोलीस अधीक्षक विशेष पथकाचे या कामगिरी करिता सर्वत्र कौतुक होत आहे.




