The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

एनपीपीएने १३७ कर्करोगविरोधी औषधांच्या सुधारित किमतींवर कडक देखरेख ठेवण्याचे निर्देश

औषधनिर्माण विभागांतर्गत असलेल्या राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने (NPPA), १३७ नॉन-शेड्यूल्ड कर्करोगविरोधी औषधांवरील ट्रेड मार्जिन रॅशनलायझेशनच्या (TMR) अंमलबजावणीवर कडक देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत, ज्याअंतर्गत सुधारित कमाल किरकोळ किंमती (MRPs) ९ नोव्हेंबर २०२६ पासून लागू होत आहेत.

या सुधारित किंमती १७ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या राजपत्र आदेशाद्वारे अधिसूचित करण्यात आल्या आहेत, असे प्राधिकरणाने म्हटले आहे.

११ नोव्हेंबर २०२६ पर्यंत औषध कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या निवेदनांवर आधारित नवीनतम सुधारित किंमत सूची, NPPA च्या वेबसाइटवर आणि ‘फार्मा सही दाम’ ॲप व पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

NPPA ने सर्व उत्पादक, किरकोळ विक्रेते, वितरक, स्टॉकिस्ट, रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांना सुधारित किंमतींचे पालन करण्याचे आणि त्यांच्या आवारात व वेबसाइटवर अद्ययावत किंमत सूची ठळकपणे प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्य औषध नियंत्रकांना अनुपालन सुनिश्चित करण्याचे निर्देश

सुधारित किमतींचा लाभ रुग्णांपर्यंत पोहोचेल याची खात्री करण्यासाठी, उत्पादक, विक्रेते, रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांकडून होणाऱ्या अनुपालनावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश राज्य औषध नियंत्रकांना (एसडीसी) देण्यात आले आहेत.

प्रशासनाने इशारा दिला आहे की, नियमांचे उल्लंघन केल्यास औषध (किंमत नियंत्रण) आदेश (डीपीसीओ), २०१३ च्या तरतुदींनुसार अतिरिक्त दर आकारल्याबद्दल कारवाई केली जाऊ शकते.

ग्राहक औषधांवरील अतिरिक्त दर, तुटवडा किंवा अनुपलब्धतेशी संबंधित तक्रारी ‘फार्मा सही दाम’ ॲप किंवा पोर्टलद्वारे, एनपीपीए हेल्पलाइन १८००-१११-२५५ वर किंवा monitoring-nppa@gov.in या ईमेलवर नोंदवू शकतात.

एनपीपीएने राज्य औषध नियंत्रकांना १६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.

-पीआयबी

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts