The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

प्रवीणला आत्महत्येस प्रवृत्त करणारे कोण ? स्थानिक की आर्थिक गुन्हे शाखेचे ते दोन कर्मचारी कोण ?

प्रवीण धनाईत या 29 वर्षीय तरुणाने नदीत उडी मारून स्वतःचे जीवन संपवले. वरकरणी ही आत्महत्या वाटतं असली तरी हे टोकाचे पाऊल उचलण्याकरिता त्याला प्रवृत्त करणाऱ्या घटना घडल्याचे कळते. त्याच्या वडिलांनी याचे स्पष्ट संकेत दिले असून त्याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदविलेली आहे.

या प्रकरणी The Sapiens News ने स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीणचे तपसी अधिकारी एपीआय नितीन रणदिवे यांनी देखील आपली प्रतिक्रिया जाणून घेतली

प्रवीणच्या दुर्दैवी आत्महत्येच्या कहाणीत पुढील मुख्य पात्र असल्याचे समजते अमोल जीवनलाल समदडिया व तुषार समदडिया हे दोघे बंधू ज्यांनी प्रवीण सह इतर 8 जणांविरोधात अपहाराचा गुन्हा नोंदविला तोही वणी पोलीस स्टेशनला. येथेच संशयाची सुई आणि शंका घेणे इतपत काही काळबेर असल्याचे वाटते. शहरात घडलेल्या शहरात राहणाऱ्या व्यक्तींना वणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्याची आवश्यकता का पडावी का तेथे कोणी त्यांचे फेवरचे होते का ? जे त्यांना प्रवीण व इतर लोकांवर पोलिसी खाक्या दाखवण्यासाठी मदत करीन दबाव आणील अथवा खोटे गुन्हे दाखल करण्यास मदत करीन. त्यामुळेच नाशिक ग्रामीण पोलिस दलातील संशयित दोन कर्मचारी या मागे असल्याचं एका संकेतस्थळावर नमूद केल्याचं कळते. संबंधित खोट्या असलेल्या गुन्ह्यात प्रवीणला जामीन होता त्यामुळे तो प्रचंड दबावत होता असे त्याच्या वडिलांनी कथन केल्याचे कळते. त्याचबरोबर संबंधित संशयतांनी प्रवीणला दुकानात बोलावून घेऊन बाउन्सर करवी मारहाण केल्याचे देखील कळते त्यात त्याचा दात तुटलेला होता.
यातच 22 डिसेंबर 2025 रोजी प्रवीणने घरी कॉल करून सांगितले की मी घरी येत आहे परंतु तो घरी आला नाही आणि दुसऱ्या दिवशी त्याची बॉडी आनंदवली परिसरातील नदीपात्रात सापडली यावरून आपण काय समजावे ?
येथे हा प्रश्न उपस्थित होतो की आर्थिक गुन्हे शाखेतील किंवा नाशिक ग्रामीण पोलीस मधील ते दोन कर्मचारी कोण ज्यांनी संशय त्यांना या गुन्ह्यात मदत केली संबंधित संशयतांचे कॉल रेकॉर्ड चेक करून या गुन्ह्यात प्रवीणला कुणी गोवले आणि निष्पाप प्रवीणला कुणी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष प्रवृत्त केले याचा छडा लावणे ही मोठी जबाबदारी ग्रामीण पोलीसवर येऊन ठेपते. येथे policing नाही तर beyond negative poliching  झाल्याचा दाट संशय आहे. ज्याला सर्वस्वी जबाबदार संबंधित पोलीस कर्मचारी असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. जे प्रवीणचे वडील अरुण धनाईत यांच्या तक्रारीत देखील नमूद असल्याचे कळते आहे. तरी संशयीतांच्या बरोबर कोणत्या पोलिसांचे संभाषण झाले या दृष्टीने देखील तपास व्हावा आणि त्या संबंधात काही आर्थिक देवघेव झाली का हे देखील तपासावे The Sapiens News आशा करते की यात संबंधित संशय असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा काहीही संबंध नसेल आणि त्यांनी त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले असेल.

संपादक : शिरीष प्रभाकर चव्हाण
The Sapiens News

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts