The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

महाराष्ट्र राज्याच्या माहिती अधिकार कायद्यात बदल केल्याने अण्णा हजारे यांचे पाच जुलैपासून उपोषण

महाराष्ट्र सरकारने माहिती अधिकार (RTI) कायद्याच्या नियमांत केलेल्या बदलांमुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत थेट उपोषणाचा इशारा दिला आहे. सुधारणा मागे न घेतल्यास ५ जुलैपासून राळेगणसिद्धी येथे आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून स्पष्ट केले आहे.माहिती अधिकारातील आक्षेपार्ह बदल आणि अण्णा हजारेंचा विरोध:शुल्कवाढ: माहिती अर्जाचे शुल्क ₹१० वरून ₹३० करण्यात आले असून, प्रती पान झेरॉक्स दर आणि अपिलांचे शुल्क वाढवण्यात आले आहे.अनिवार्य ओळखपत्र: अर्जासोबत स्वतः साक्षांकित केलेले फोटो ओळखपत्र जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे, ज्यामुळे माहिती देणाऱ्या (व्हिसलब्लोअर) कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.शब्द व विषयांची मर्यादा: अर्जात केवळ एकाच विषयावर माहिती मागवता येईल आणि १५० शब्दांची मर्यादा लागू केली आहे.इतर बंधने: माहिती आयोगाच्या सुनावणीदरम्यान कायदेशीर सहाय्यास मनाई, अर्जदाराची गैरहजेरी असल्यास प्रकरण फेटाळणे आणि एकाच विषयावर पुन्हा अर्ज करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.अण्णांच्या मते, हे नियम सर्वसामान्य नागरिकांच्या अधिकारांची गळचेपी करणारे आणि भ्रष्टाचाऱ्यांना वाचवणारे आहेत.